Friday, May 3, 2024
Homeनगरमालुंजे खुर्दला हाणामारी

मालुंजे खुर्दला हाणामारी

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

काहीएक कारण नसताना एकमेकांना शिवीगाळ करुन लोखंडी गज व लाकडी दांडक्याने हाणामारी झाल्याची घटना दि. 5 व 6 फेब्रुवारी

- Advertisement -

रोजी राहुरी तालुक्यातील मालुंजे खुर्द येथे घडली. याबाबत परस्पर विरोधात जबर मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण सातजणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रावसाहेब एकनाथ साळुंके (वय 48 रा. मालुंजे खुर्द ता. राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजे दरम्यान यातील फिर्यादी व साक्षीदार हे त्यांच्या घराला पाणी मारत व गप्पा करत असताना यातील आरोपी हे तेथे आले. आणि काहीएक कारण नसताना शिवगाऴ करु लागले.

यावेळी रावसाहेब साळुंके म्हणाले, तुम्ही आम्हाला शिवीगाऴ का करत आहे? असे म्हणाल्याचा आरोपींना राग आल्याने त्यांनी लोखंडी गजाने रावसाहेब साळुंके यांना मारहाण करुन त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत केली. तसेच लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाऴ करत पुन्हा जर आमच्या नादाला लागला तर तुम्हाला जीवंत सोडणार नाही, असा दम दिला.

साळुंंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ज्ञानेश्वर विठ्ठल सोळुंके, श्याम रमेश सोऴुंके, रमेश विठ्ठल सोऴुंके सर्व राहणार मालुंजा ता. राहुरी या तिघांविरुद्ध जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक चव्हाण हे करीत आहेत.

तर दुसरी फिर्याद शाम रमेश साळुंके (वय 22 वर्षे, राहणार मालुंंजे खुर्द ता. राहुरी) यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 6 फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजे दरम्यान यातील आरोपी हे शाम साळुंके यांच्या घरासमोर आले व काहीएक कारण नसताना लोखंडी दाताळाने शाम साळुंके यांना मारहाण केली.

यावेळी भांडण सोडविण्यासाठी त्यांचे आई, वडील आले असता त्यांना देखील लोखंडी दाताळाने मारहाण करुन ढकलून दिले. तसेच लाथाबुक्कयानी मारहाण केली. आणि तुला आम्ही मारुन टाकू. अशी जीवे मारण्याची धमकी दिली.

शाम साळुंके यांच्या फिर्यादीवरून आरोपी रामदास एकनाथ सोळुंके, मेघराज रामदास सोळुंके, रावसाहेब एकनाथ सोळुंके, योगेश रावसाहेब सोळुंके (सर्व राहणार मालुंजे खुर्द ता. राहुरी) या चारजणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भवार हे करीत आहेत. या परस्पर झालेल्या फिर्यादीवरून दोन्ही बाजूकडील एकूण सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या