Friday, May 3, 2024
Homeनगरसर्वेक्षण करू पण डाटा एंट्री दुसर्‍यांना द्या

सर्वेक्षण करू पण डाटा एंट्री दुसर्‍यांना द्या

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) –

राज्य शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत सर्वेक्षणाचे काम चांगले करू; पण डाटा एंट्रीचे काम डाटा ऑपरेटर यांच्याकडून करण्यात यावे, अशी मागणी

- Advertisement -

आशा व गटप्रवर्तक संघटनेने तालुका वैद्यकीय अधिकारी सलमा हिरामी यांच्याकडे केली आहे.

भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड. सुभाष लांडे व संजय नांगरे यांच्या नेतृत्वाखाली आशा व गटप्रवर्तक संघटनेने डॉ. सलमा हिराणी व आरोग्य विस्तार अधिकारी सुरेश पाटेकर यांना निवेदनात म्हटले आहे की, सर्वच आशा स्वयंसेविका यांच्याकडे अँड्रॉईड मोबाईल नाही, तसेच कोणतेही प्रशिक्षण नसल्याने माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत ऑनलाईन डाटा एंट्री करण्यास आशा व गटप्रवर्तक असमर्थ आहेत. तरी ऑनलाईन सर्व्हेच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर वैशाली वाघुले, सुरेखा राऊत, वैशाली देशमुख, अलका पाचे, सुनैत्रा महाजन, अंजली भुजबळ, सुलभा महाजन, पौर्णिमा इंगळे, गीता थोरवे, शीतल थोरवे, रत्नमाला क्षीरसागर, सुनीता गांडुळे, वैशाली भुतकर, अनिता भुजबळ, सुवर्णा साळुंके, ज्योती ढोले, संगीता रायकर, संगीता पिसोटे, स्वाती क्षीरसागर, रंजना परदेशी, आरती मोहिते , मिनाक्षी हार, अर्चना शिंदे, वैशाली झिरपे, सविता काकडे, सुनीता देवढे आदी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या सह्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या