Saturday, July 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज्यात १ लाख ८२ हजार कुपोषित बालके

राज्यात १ लाख ८२ हजार कुपोषित बालके

विधानभेत लेखी उत्तरात धक्कादायक माहिती

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यात १ लाख ८२ हजार ४४३ कुपोषित बालके आढळली असून त्यापैकी ३० हजार ८०० बालके गंभीर तीव्र कुपोषणाच्या श्रेणीत असून १ लाख ५१ हजार ६४३ बालके मध्यम कुपोषित श्रेणीत असल्याची धक्कादायक माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे. राज्यात सर्वाधिक २ हजार ७७८ तीव्र कुपोषित बालके मुंबई उपनगरात आढळून आल्याचे तटकरे यांनी उत्तरात नमूद केले आहे.

- Advertisement -

काँग्रेसचे नागपूर पश्चिमचे आमदार विकास ठाकरे आणि अन्य आमदारांनी कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत लेखी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात महिला आणि बालविकास विभागाने राज्यभरातील कुपोषित बालकांची आकडेवारी दिली आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात ८ हजार ९४४ मध्यम कुपोषित तर १ हजार ८५२ तीव्र कुपोषित बालके आढळून आली आहेत. धुळे जिल्ह्यात ६ हजार ३७७ मध्यम कुपोषित तर १ हजार ७४१ बालके तीव्र कुपोषित आहेत.

पोषण श्रेणीनुसार मुंबई महानगरपालिकेने ६ हजार ९२ बालकांच्या पोषण श्रेणीची नोंदच केली नसल्याचे आणि सर्वाधिक कुपोषित बालके मुंबईच्या उपनगरात असल्याचे निदर्शनास आले आहे हे खरे आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावरील लेखी उत्तरात महिला आणि बालविकास विभागाने ही माहिती अंशतः खरे असल्याचे मान्य केले आहे.

अंगणवाडी सेविकांची पदे रिक्त
राज्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांची सुमारे ३ हजार ६०२ पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे बालविकास प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षिकांचीही पदे रिक्त आहेत. ही रक्त पदे भरण्याबाबत कार्यवाही सुरु असल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे.


ताज्या बातम्या

दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या वतीने आज टॉर्च मार्च काढण्यात आला.सायंकाळी 6 वाजता कॅनडा कॉर्नर येथून...