Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रवीजग्राहकांना दिलासा! १ एप्रिलपासून घरगुती वीजदरात १ टक्क्याने कपात

वीजग्राहकांना दिलासा! १ एप्रिलपासून घरगुती वीजदरात १ टक्क्याने कपात

मुंबई l Mumbai

राज्यात १ एप्रिलपासून नवीन वीजदर लागू होणार आहेत. राज्य वीज नियामक आयोगाने आगामी पाच वर्षांसाठी राज्यातील वीज ग्राहकांचे वीजदर कसे असतील हे देखील जाहीर केले आहे.

- Advertisement -

१ एप्रिल २०२१ पासून वीज दरात २ टक्के कपात करण्याचे आदेश राज्य वीज नियामक आयोगाने राज्यात विजेचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना दिले आहेत. राज्य वीज नियामक आयोगाने इंधन समायोजन कर (FAC) फंडचा वापर करून ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश वीज कंपन्यांना दिले आहेत.

या आदेशानुसार महावितरण, बेस्ट, टाटा, अदाणी या कंपन्यांच्या वीजदरात सरासरी २ टक्क्यांची कपात केली जाईल. तर टाटा पॉवरच्या विजेच्या दरात मात्र वाढ होणार आहे. १ एप्रिलपासून हे नवीन वीजदर लागू होणार आहेत.

आगामी पाच वर्षांसाठी राज्यातील वीज ग्राहकांचे वीजदर कसे असतील हे देखील राज्य वीज नियामक आयोगाने जाहीर केले आहेत. यानुसार महावितरणच्या घरगुती वीजबिलात १ टक्के कपात केली आहे. त्यामुळे प्रत्येक युनिटमागे ७.५८ रुपये ग्राहकांना मोजावे लागतील. अदाणीच्या ग्राहकांसाठीही ०.३ टक्के इतकी वाढ लागू होणार असून प्रत्येक युनिटसाठी ६.५३ रूपये मोजावे लागतील. बेस्टच्या ग्राहकांसाठी ०.१ टक्के दरवाढ करण्यात आला असून युनिटमागे ६.४२ रुपये ग्राहकांना मोजावे लागतील.

टाटा पॉवरच्या वीज ग्राहकांसाठी यंदाच्या १ एप्रिलपासून वीज दरवाढी जाहीर झाली आहे. टाटा पॉवरच्या वीज ग्राहकांना आता युनिटमागे ५.२२ रूपये मोजावे लागतील. टाटा पॉवरच्या वीज ग्राहकांसाठी ४.३ टक्के दरवाढ आयोगाने मंजुर केली आहे.

गेल्या महिन्यांपासून वीज दरात लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे मध्यमवर्गीयांवरती अतिरिक्त बोजा पडत होता. दोन दिवसांपूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जोपर्यंत वाढीव वीज दराबाबत सभागृहात चर्चा होत नाही, तोपर्यंत कोणाचे वीज कनेक्शन कापण्यात येणार नाही, असे आश्वासन दिले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या