Tuesday, February 3, 2026
Homeनगरशिर्डी विमानतळाच्या 1 हजार 367 कोटींच्या विकास कामांना मान्यता, लवकरच नाईट लँडिंग...

शिर्डी विमानतळाच्या 1 हजार 367 कोटींच्या विकास कामांना मान्यता, लवकरच नाईट लँडिंग सुविधा – अजित पवार

मुंबई | Mumbai

विमानतळाच्या विस्तार आणि विकासासाठी 1,367 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, त्या कामांना वेगाने सुरुवात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत 2025 चा अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली.

- Advertisement -

सन 2021 मध्ये शिर्डी विमानतळाला प्रमुख विमानतळाचा दर्जा मिळाला होता. आता विमानतळाच्या सुविधांमध्ये आणखी सुधारणा करत लवकरच नाईट लँडिंग सुविधाही सुरू केली जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

YouTube video player

शिर्डी हे धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असल्याने या विमानतळाच्या विकासामुळे भाविक आणि पर्यटकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. विस्तारित सुविधांमुळे देशभरातील प्रवाशांसाठी हा विमानतळ अधिक कार्यक्षम आणि सुटसुटीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

Ravindra Pagar Passed Away : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र नाना पगार (Ravindra Pagar) यांचे अल्पशा आजाराने (आज दि.३) निधन झाले. त्यांचा अंत्यविधी बुधवार दि....