Thursday, June 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूज‘१०८’ रुग्णवाहिका चालकांचे कामबंद आंदोलन तात्पुरते स्थगित

‘१०८’ रुग्णवाहिका चालकांचे कामबंद आंदोलन तात्पुरते स्थगित

- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी Nashik

‘१०८’ रुग्णवाहिका चालकांच्या मागण्यांकडे सरकार आणि कंपनीने दुर्लक्ष केल्यामुळे १०८ रुग्णवाहिका चालक व डॉक्टर्सनी ३० जूनच्या मध्यरात्रीपासून राज्यभर कामबंद आंदोलन सुरू केले होते. मात्र, बीव्हीजी कंपनीच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन १ जुलैपासून तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. ४ जुलै रोजी पुण्यात कंपनीच्या मुख्य कार्यालयात बैठक होणार आहे.

बीव्हीजी कंपनीच्या व्यवस्थापनाने सिटू संघटनेच्या पदाधिकार्‍यांसोबत चर्चा करून चौकशी व तोडग्यासाठी पुढाकार घेतल्याचे पत्र देताच, १०८ रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्यने आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला.

चालक व डॉक्टर्स यांच्या प्रमुख मागण्या
’समान काम, समान वेतन’ या तत्वावर वेतन व भत्ते मिळावेत.,
शासकीय आरोग्य कर्मचार्‍यांचा दर्जा द्यावा.,
कायद्यानुसार पीएफ, ग्रॅज्युएटी, बोनस, रजा व विमा सुविधा द्याव्यात.,
आठ तासांपेक्षा जास्त कामाचे अतिरिक्त वेतन मिळावे.,
रुग्णवाहिका धोरणात पारदर्शकता व सुधारणा करावी.,
जर्जर रुग्णवाहिकांच्या जागी नव्या रुग्णवाहिका त्वरित उपलब्ध करून द्याव्यात.,

मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा होईल, अशी आशा आहे. अन्यथा, आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा डॉ. डी. एल. कराड (सिटू, राज्य अध्यक्ष) यांनी दिला.

राज्यात २० जिल्ह्यांतील चालक व डॉक्टर्स या आंदोलनात सहभागी झाले होते. वारकर्‍यांच्या सेवेसाठी काही रुग्णवाहिका बंद न ठेवता सामाजिक भान राखल्याचे यावेळी संघटनेने स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

Crime News : महिलेवर चाकूने वार करुन अत्याचाराचा प्रयत्न

0
गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi महिलेवर चाकूने वार करुन अत्याचाराचा प्रयत्न करणार्‍या आरोपीला पाच वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा नेवासा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली...