मुंबई | प्रतिनिधी Mumbai
मंत्रालयातील माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे सहायक अधीक्षक सुमित हरीदास राठोड (वय ४५) यांचे शनिवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने विरार येथील राहत्या घरी निधन झाले.त्यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, दोन बहिणी, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
सुमित राठोड हे मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी होते. २००८ मध्ये त्यांची माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयात लिपिक पदावर नियुक्ती झाली होती. गेल्या १८ वर्षांपासून ते महासंचालनालयाच्या सेवेत होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी विविध शाखांमध्ये जबाबदारीने आणि उत्तमपणे कामकाज केले. त्यानंतर त्यांना सहायक अधीक्षक पदावर पदोन्नती मिळाली होती.
त्यांचे पार्थिव काल रात्री मुंबई येथून यवतमाळ येथे आणण्यात आले. उद्या, रविवारी सकाळी यवतमाळ येथील मोक्षधाम, आर्णी रोड, वडगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.




