Friday, October 11, 2024
Homeमुख्य बातम्याआज दहावीचा ऑनलाईन निकाल

आज दहावीचा ऑनलाईन निकाल

पुणे । प्रतिनिधी Pune

बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते. मात्र, दहावीच्या निकालाची प्रतिक्षा संपली असून आज ( दि. 2) दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकालाची अधिकृत घोषणा त्यांच्या संकेत स्थळावर केली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावीची परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थी बसले होते. त्यात 8 लाख 44 हजार 116 मुले आणि 7 हजार 33 हजार 067 मुलींचा समावेश होता.राज्यभरातील 5 हजार 33 केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती.दहावीचा निकाल केव्हा जाहीर होणार याबाबत विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली होती.मात्र,आता निकालाची तारीख जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांची उत्कंठा अधिकच वाढली आहे. येत्या 2 जून रोजी निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन निकालाची ऑनलाईन प्रिंटआऊट काढून घेता येणार आहे.

या संकेतस्थळांवर पाहा निकाल

www.mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://ssc.mahresults.org.in

- Advertisment -

ताज्या बातम्या