Friday, May 3, 2024
Homeनाशिकदेवळा तालुक्यात नव्या ११ रुग्णांची भर

देवळा तालुक्यात नव्या ११ रुग्णांची भर

भऊर | Bhaur

देवळा तालुक्यात आज दि.१३ रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोरोनाच्या ११ रुग्णांची भर पडली असून सर्वाधिक रुग्ण देवळा नगरपंचायत हद्दीतील आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली.

- Advertisement -

देवळा तालुक्यात आतापर्यंत ४५८ करोनाचे रुग्ण आढळून आले असून त्यातील ३८७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

सद्यस्थितीत देवळा येथील कोविड सेंटरमध्ये १२ रुग्णांवर उपचार सुरू असून चांदवड उपजिल्हारुग्णालयात ७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. खाजगी रुग्णालयामध्ये १४ रुग्ण उपचार घेत असून एक रुग्ण कळवण तालुक्यातील अभोना कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. घरीच उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या २९ असून आतापर्यंत तालुक्यात आठ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

सद्यस्थितीत देवळा तालुक्यातील एकूण ६३ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील सर्वाधिक २२ रुग्ण देवळा नगरपंचायत हद्दीतील आहेत त्या खालोखाल १८ रुग्ण उमराणे येथील आहेत.

आज (दि.१३) रोजी प्राप्त झालेल्या अहवालात सहा रुग्ण देवळा नगरपंचायत हद्दीतील असून दोन दहिवड व तीन रुग्ण झिरेपिंपळ येथील असल्याचे डॉ.सुभाष मांडगे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या