Thursday, September 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजखासगी रुग्णालयांतील बेडसंख्या, बिलिंगची होणार तपासणी

खासगी रुग्णालयांतील बेडसंख्या, बिलिंगची होणार तपासणी

जादा बिल आकारणीच्या तक्रारी; १० ऑक्टोबरपर्यंत सखोल अहवाल सादर करण्याचे स्थायी समितीचे निर्देश

- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शहरातील खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारींसह महापालिकेचीही फसवणूक होत असल्याचा आरोप स्थायी समितीच्या सभेत करण्यात आला. मंजूर बेडसंख्येपेक्षा अधिक बेड वापरणाऱ्या रुग्णालयांची तसेच महापालिकेकडे भरल्या जाणाऱ्या कराची तपासणी करण्याची मागणी सदस्यांनी केली. त्याची गंभीर दखल घेत सभापती मच्छिंद्र सानप यांनी शहरातील सर्व खासगी रुग्णालयांमधील मूलभूत व पायाभूत सुविधांसह बेडसंख्या आणि अन्य बाबींची सखोल पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आरोग्य वैद्यकीय विभागाला दिले.

शासन निर्णयानुसार १० ऑक्टोबरपर्यंत ही पाहणी पूर्ण करून अहवाल तयार केला जाणार असून, तो स्थायी समितीसमोर सादर केला जाणार आहे. खासगी रुग्णालयांमधील अव्वाच्या सव्वा बिल आकारणीवरही सभेत चिंता व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय विभागाच्या तयारीचाही आढावा घेण्यात आला. मनपाच्या वैद्यकीय विभागातील ९३४ मंजूर पदांपैकी ३८९ पदे रिक्त असून, मनुष्यबळाअभावी आरोग्य सेवांवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. सरळसेवेने भरती होईपर्यंत मानधनावर मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश सभापतींनी दिले.

सिंहस्थासाठी १,६१८ मनुष्यबळाची आवश्यकता असून, त्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच सिंहस्थाच्या अनुषंगाने १०५ कोटी रुपयांचा प्रस्ताव कुंभमेळा प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला असून, तपोवनातील दवाखान्याची बेडसंख्या वाढविण्यासह विविध कामांचा त्यात समावेश आहे.

मनपाच्या रुग्णालयांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी, वॉटर फिल्टर, रुग्णवाहिका, बेडशीट व पिलो कव्हर उपलब्ध करून देण्याची मागणीही सदस्यांनी केली.

ताज्या बातम्या

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी यंत्रणा उभारणार

0
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची आज, 10 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत विद्यार्थ्यांनी...