Thursday, October 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजश्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

आवश्यक निधीसाठी पुरवणी मागण्यांवर चर्चा

- Advertisement -

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासह केवायसी प्रक्रिया अधिक सोयीस्कर करण्यावर भर देण्यात येणार आहे. विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत करण्यात येत असल्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.

मंत्रालय दालनात विशेष सहाय्य विभागाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत श्रावणबाळ योजनेसह विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, केवायसी प्रक्रिया, अर्ज करताना लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्या दूर करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विभागाशी संबंधित योजनानुरूप आवश्यक निधीसाठी पुरवणी मागण्यांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. योजनांसाठी आवश्यक आर्थिक तरतुदी आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.

शासनाच्या योजनांचा लाभ मिळवताना पात्र लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये, अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी आणि योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली.

बैठकीस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, सहसचिव सोमनाथ बागुल उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Shirdi : साईबाबा संस्थानच्या पादुका दौर्‍यामुळे शिर्डीत भाविकांची संख्या घटली

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi श्री साईबाबा संस्थान प्रशासन शिर्डीत येणार्‍या भाविकांना चांगल्या सोयी-सुविधा देण्याऐवजी साईबाबांच्या पादुका विविध राज्यांत आणि देशांत घेऊन जाण्यातच मग्न आहे. संस्थानच्या...