Tuesday, September 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकेंद्र शासनाकडून सेवा पदके जाहीर : नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह...

केंद्र शासनाकडून सेवा पदके जाहीर : नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयातर्फे दिली जाणारी मानाची केंद्रीय अतिउत्कृष्ट सेवा पदक आणि केंद्रीय उत्कृष्ट सेवा पदके (२०२६) जाहीर झाले असून, यामध्ये नाशिक शहर पोलीस आयुक्तालय, नाशिक परिक्षेत्र व महाराष्ट्र पोलीस अकादमीतील अधिकारी व कर्मचार्‍यांनी बाजी मारली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह परिक्षेत्रातील जिल्हा पोलीस प्रमुखांचा व अंमलदारांचा यात समावेश असल्याने नाशिक पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

नाशिक शहराचे पोलीस आयुक्त (विशेष पोलीस महानिरीक्षक) संदीप कर्णिक, जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, नंदुरबारच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिकचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. तर महाराष्ट्र पोलीस अकादमीचे पोलीस अधीक्षक नंदकुमार टी. ठाकूर यांना अतिउत्कृष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

आयुक्तालय चमकले
शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. आंचल मुदगल, उपनिरीक्षक सलीम काझी, ज्ञानदेव राणे, सहायक उपनिरीक्षक विजय लभडे, शेखर फरताळे, शेरखान पठाण, काशिनाथ बागुल व हवालदार प्रदीप म्हसदे यांना अतिउत्कृष्ट सेवा पदके जाहीर झाली आहेत. तसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्ाकी, जगवेंद्रसिंग राजपूत, अंकुश चिंतामण, अशोक शरमाळे, रणजीत नलवडे, सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, चेतन श्रीवंत आणि हवालदार प्रशांत वालझाडे यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे.

ग्रामीणच्या अधिकार्‍यांचा गौरव
नाशिक ग्रामीण व परिक्षेत्र्ाातील नाशिक ग्रामीणचे पोलीस निरीक्षक घनशाम बाळाप, पोलीस उपनिरीक्षक किरण शेलार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप यांसह धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील अनेक पोलीस कर्मचार्‍यांनी विविध श्रेणीत पदके मिळवत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे आणि गुन्हे तपासात दाखवलेल्या तत्ापरतेबद्दल संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून या पदकांचे स्वागत होत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गावगाडा आता कुणाच्या हाती?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने जिल्ह्यातील 753 ग्रामपंचायतींच्या कारभाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. निवडणुका होईपर्यंत गावांचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी नियुक्त करण्यात...