Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजआजपासून ‘देशदूत पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो’

आजपासून ‘देशदूत पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो’

हक्काचे घर घेण्याची सुवर्णसंधी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

दैनिक‘देशदूत’तर्फे शुक्रवार दि. १४ ते रविवार दि. १६ नोव्हेंबर दरम्यान आयाजित ‘पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो २०२५’चा आजपासून प्रारंभ होणार आहे. एक्स्पोचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आज सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

YouTube video player

या एक्पोचे मुख्य प्रायोजक ‘हर्षल हणमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि., तर सहप्रयोजक सुमित बिल्डकॉन आहेत. पंचवटी येथील एस. एल. के. प्रॉपर्टीज, राज स्वीट्ससमोर, आरटीओ कॉर्नर, दिंडोरीरोड येथ सुरू होत असलेल्या प्रॉपर्टी एक्स्पोचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आज सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुल ढिकले, बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक राजेश देशमुख, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर, हर्षल हणमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक हर्षल हणमंते, सुमित बिल्डकॉनचे संचालक सुमित चौधरी उपस्थित राहणार आहेत.

‘स्मार्ट सिटी’ बनण्यासाठी नाशिकची वाटचाल सुरू असतांना नाशिक शहरातील प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंचवटी विभागाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. भौगोलिक विस्तार पाहता शहराच्या शेवटच्या टोकापर्यंत नागरी वसाहतींचे जाळे पसरल्याचे दिसून येते. सरकारी-निमसरकारी आस्थापना, शाळा, महाविद्यालय, आसपासच्या गावांना जोडणारे राज्य व राष्ट्रीय महामार्ग, विविध ब्रँड्सचे आऊटलेट्स व मॉल, कृषी उत्पन्न बाजार समिती, मोठ्या बाजारपेठा, शेतीप्रधान परिसर यामुळे रहिवासी क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पंचवटी भागातील अर्थचक्राला गती प्राप्त होत आहे.

यांचा असेल सहभाग
हर्षल हणमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि., सुराणा ग्रुप, महालक्ष्मी इस्टेट, मॅप इन्फ्रा (आनंदग्राम), आशापुरी कन्स्ट्रक्शन, श्याम ग्रुप, सी. डी. आय. एल., एलिका ग्रुप, वेदाज स्पेसेस, ओंकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, इच्छामणी बिल्डकॉन, ट्रीनीती रिअल्टर्स, फोर्थ डायमेंशन डेव्हलपर्स, क्रिश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स, समर्थ ग्रुप, रचिता कन्स्ट्रक्शन्स प्रा. लि., शेठ रियल्टी, सोमविजय कन्स्ट्रक्शन्स, हरी ओम ग्रुप, न्यू जय अंबे प्रॉपर्टीज, स्वामी डेव्हलपर्स, मधू विठ्ठल रियल्टी,

‘देशदूत’ प्रॉपर्टी एक्स्पोचे मुख्य प्रायोजक नाशिककरांचे ३७ वर्षांपासून असलेले फॅमिली बिल्डर हर्षल हणमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि., सहप्रयोजक सुमित बिल्डकॉन, फायनान्शिअल पार्टनर बँक ऑफ महाराष्ट्र तर, पर्यावरणीय पार्टनर पपायाज नर्सरी आहेत. १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत दररोज दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांना प्रवेश खुला आहे. नागरिकांनी ‘देशदूत’ आयोजित पंचवटी प्रोपर्टी एक्स्पोला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Ravindra Pagar Passed Away : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र नाना पगार (Ravindra Pagar) यांचे अल्पशा आजाराने (आज दि.३) निधन झाले. त्यांचा अंत्यविधी बुधवार दि....