Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारसद्गव्हाण येथे १४ व्या पाटोत्सवाचे आयोजन

सद्गव्हाण येथे १४ व्या पाटोत्सवाचे आयोजन

तळोदा | ता.प्र. – TALODA

कुकरमुंडा तालुक्यातील सदगव्हाण (Sadgavhan) (गुजरात) येथे बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरात (Sri Swaminarayan Temple) १४ व्या पाटोत्सवानिमित्त (Patotsava) दि.५ ते ७ जूनपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन (Organizing events) करण्यात आले आहे. जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वामीनारायण मंदिर सत्संगी ग्रामस्थांनी केले आहे.

- Advertisement -

कुकरमुंडा तालुक्यातील सदगव्हाण येथे बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात (Sri Swaminarayan Temple) १४ वा पाटोत्सव स्वामीनारायण मंदिर सुरत येथील कोठारी उत्तमप्रकाश स्वामी सांकरी (गुजरात) येथील पूजनीय पूर्ण दर्शन स्वामी यांच्या उपस्थितीत दि.५ जूनपासून विविध धार्मिक कार्यक्रम (Organizing events) होणार आहेत.

याप्रसंगी शिखर पूजन ध्वजारोहन (Shikhar Pujan flag hoisting) संस्थेचे पूज्य उत्तम प्रकाश स्वामी पुण्यदर्शन स्वामी आदर्श तिलक स्वामी ध्यान जीवन स्वामी मंगल भूषण स्वामी नारायणप्रिय स्वामी वेदभगत मैत्री भगत आदींसह संत महंतांचे मार्गदर्शन प्रवचन, विराट जनजाती संमेलन,

आपले गाव आदर्श गाव व्यसनमुक्ती अभियान (De-addiction campaign) व प्रमुख स्वामी महाराज शताब्दी महोत्सवाच्या उद्घघोष विशिष्ट विशाल जल सभेचे आयोजन दृकश्राव्य साधनाद्वारा करण्यात आले आहे.

दि.५ जून रोजी संध्याकाळी ६ ते ८ विराट जनजाती संमेलन (Virat Janajati Sammelan), दि.६ जून संध्याकाळी ६ ते ८ माझे गाव आदर्श गाव, सुंदर प्रस्तुती, दि.७ जून रोजी ४ ते ५.३० पाटोत्सव महापूजा विधिवत व ५.३० ते ६ शिखर पूजा विधि व तसेच ६ ते रात्री ८ वाजेपासून प्रमुख स्वामी महाराज शताब्दी महोत्सव उद्घोष विशिष्ट विशाल जनसभा आदींसह धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

सदगव्हाण बीएपीएस मंदिर स्वामीनारायण संस्थांनतर्फे तापी व नंदुरबार जिल्ह्यातील संत महंत मंत्री खासदार, आमदार, राजकीय क्षेत्रातील आजी-माजी पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, विविध संस्थेचे चेअरमन, व्हा.चेअरमन आदी उपस्थित राहणार आहेत. भाविकांनी या विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या