Friday, November 22, 2024
HomeनाशिकLoksabha Election 2024 : सकाळी अकरा वाजेपर्यंत नाशिकमध्ये १६.३० तर दिंडोरीत...

Loksabha Election 2024 : सकाळी अकरा वाजेपर्यंत नाशिकमध्ये १६.३० तर दिंडोरीत १९.५० टक्के मतदान

विधानसभानिहाय मतदानाची टक्केवारी किती?

नाशिक | Nashik

जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी या मतदारसंघासाठी (Dindori and Nashik Loksabha) आज पाचव्या टप्प्यात मतदान होत असून सकाळपासूनच मतदान (Voting) केंद्रांवर मतदानासाठी मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढताना दिसत आहे.

- Advertisement -

सकाळी ९ वाजेपर्यंत नाशिकमध्ये ६.४५ तर दिंडोरीत ६.४० टक्के मतदान झाले होते. त्यानंतर आता सकाळी ११ वाजेपर्यंतची या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील विधानसभानिहाय मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार
नाशिक लोकसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १६.३० टक्के इतके मतदान झाले आहेत. त्यामध्ये नाशिक मध्य मतदारसंघात ११.१५ टक्के, देवळाली मतदारसंघात १६.५० टक्के, नाशिक पश्चिममध्ये १६. ८१ टक्के, नाशिक पूर्वमध्ये १६.२४ टक्के इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघामध्ये १७.३३ टक्के आणि सिन्नर मतदारसंघांमध्ये २०.१६ टक्के मतदान झाले आहे. यात सर्वाधिक जास्त मतदान सिन्नर मतदारसंघात तर सर्वात कमी नाशिक मध्य मतदारसंघात झाले आहे.

तर दिंडोरीत सकाळी सकाळी ११ वाजेपर्यंत १९.५० टक्के मतदान झाले आहे. यामध्ये नांदगावमध्ये १८.६८ टक्के, येवल्यात २०.२ टक्के, कळवण मतदारसंघात १९.२५ टक्के, चांदवड मतदारसंघात २०.८८ टक्के, निफाडमध्ये २०.०१ टक्के आणि दिंडोरी मतदार संघामध्ये १८.०९ टक्के इतके मतदान झाले आहे. यामध्ये चांदवडमध्ये सर्वाधिक तर दिंडोरीत सर्वात कमी मतदान झले आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात सायंकाळी मोठ्या प्रमाणावर मतदान होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या