Friday, October 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १२०० कोटींचा निधी वितरित करण्यास मान्यता

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १२०० कोटींचा निधी वितरित करण्यास मान्यता

नगरविकास विभागाचा शासन निर्णय जारी

- Advertisement -

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

सन २०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने कुंभमेळा प्राधिकरणाला १ हजार २०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. नगरविकास विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. हा निधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आवश्यक कामासाठी वापरला जाणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. या पुरवणी मागणीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आवश्यक कामासाठी तीन हजार कोटी रुपयांची मागणी मंजूर झाली आहे. या मंजूर तरतुदीतील १२०० कोटी रुपये वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे.

राज्य सरकारने यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये २८३ कोटी, डिसेंबर २०२५ मध्ये ७१७ कोटी, फेब्रुवारी २०२६ मध्ये ५०१ कोटी तर मे २०२६ मध्ये ३९६ कोटी असा एकूण १ हजार ८९७ कोटी रुपयांचा निधी कुंभमेळा प्राधिकरणाला दिला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....