Tuesday, October 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदेशदूत जीवन संजीवन पुरस्कार सोहळा आज

देशदूत जीवन संजीवन पुरस्कार सोहळा आज

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

वैद्यकीय क्षेत्रात निःस्वार्थ भावनेने अहोरात्र रुग्णसेवा करणार्‍या कर्तव्यनिष्ठ डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी सालाबादप्रमाणे ‘देशदूत’ तर्फे ‘जीवन संजीवन पुरस्कार सोहळा-२०२६’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेला ‘जीवन संजीवन पुरस्कार-२०२६’ सोहळा आज (दि. १८ जुलै) सायंकाळी ५.०० वाजता नाशिक-पुणे रोडवरील नासिक्ल्ब येथे होत आहे. मुख्य अतिथी म्हणून सुप्रसिद्ध लेखक आणि ख्यातनाम वक्ते डॉ. अमोल अन्नदाते उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. विशाल पवार असणार आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एसएमबीटी इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस अँड रिसर्चचे डीन डॉ महेश गाभने, एसएमबीटी मेडिकल कॉलेजचे डेप्युटी डीन डॉ. संदीप लांबे आणि आयएमए नाशिक शाखा सेक्रेटरी डॉ. पंकज भट उपस्थित राहणार आहेत.वैद्यकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणार्‍या आणि प्रदीर्घ काळ सेवा देणार्‍या पाच ज्येष्ठ डॉटरांना या सोहळ्यात मानाचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल. त्याचप्रमाणे, उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या आठ कर्तव्यदक्ष डॉटरांना जीवन संजीवन पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

डॉक्टरांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि त्यांच्या समाजोपयोगी कार्याची दखल घेण्यासाठी ‘देशदूत’ने सुरू केलेल्या या उपक्रमाचे हे चौथे वर्ष आहे. यापूर्वीच्या सर्वच पर्वांना नाशिककरांनी मोठा प्रतिसाद मिळाला आहे. कार्यक्रमाचे हेल्थ पार्टनर नामांकित एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट हे आहेत.

ताज्या बातम्या

दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार; म्हणाले ‘२०१९...

0
मुंबई | वृत्तसंस्था राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी यंदाचा दसरा मेळावा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित केला. मुंबईतील गोरेगाव येथील...