Sunday, September 27, 2026
Homeनाशिकशेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

शेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

- Advertisement -

मानूर | वार्ताहर Manur

कळवण तालुयातील भादवण शिवारात शेतजमिनीच्या वहिवाट रस्ता वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्या युवकाने विष घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेप्रकरणी कळवण पोलिसांनी तीन संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.

कळवण पोलिस ठाण्यात प्रमिला भिका जाधव यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, भादवण शिवारातील शेतजमिनीच्या मालकी व वहिवाट रस्त्याबाबत अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. संबंधित प्रकरण प्रशासनाकडे प्रलंबित आहे. दि. १३ जून रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास प्रमिला जाधव यांच्या शेतातील टोमॅटो त्यांचा मुलगा निलेश ट्रॅटरमध्ये घेऊन जात असताना . त्यावेळी वामन भाऊराव जाधव, धाकू भाऊराव जाधव आणि दिगंबर धाकू जाधव हे तिघे तेथे आले. त्यांनी निलेश याचा ट्रॅटर अडवून आमच्या रस्त्यातून तू का जात आहे , असा जाब विचारत वाद घातला.याप्रसंगी निलेश याने सदर रस्त्याचा वाद न्यायलयीन प्रविष्ट असून जो पर्यंत निकाल लागत नाही तो पर्यंत आम्ही रस्त्याचा वापर करू असे सांगितले.

त्यानंतर संबंधित तिघांनी शिवीगाळ करत फिर्यादींच्या मुलाला मारहाण करण्यात सुरुवात केली . तसेंच भविष्यात शेतात आल्यास जीवे ठार मारू अशी धमकी दिली हा सर्व प्रकार घडत असताना निलेश याने संताप व्यक्त करीत संबंधिताच्या जाचास कंटाळून जागेवरच विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रमिला जाधव यांनी तात्काळ निलेश यास कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले डॉटरांकडून त्याच्यावर उपचार करण्यात आले असून त्याची प्रकुर्ती गंभीर आहे . गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक खगेंद्र टेम्भेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास पांडुरंग गवळी करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजकारणात टीका करताना लक्ष्मणरेषेचे भान ठेवा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राजकीय टीका करताना कौटुंबिक विषय टाळले पाहिजेत. आमच्यावर राजकीय टीका करा, आमच्या कार्यपद्धतीवर किंवा सरकारच्या कामावर टीका करा, मात्र कौटुंबिक वादात...