सद्गुरूंच्या महाशिवरात्री उत्सव सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्यात उद्या सकाळीसहा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सद्गुरूंना जगभरातील ५ दशलक्ष भाविकांना वितरीत केल्या जाणाऱ्या रुद्राक्षांना प्राण प्रतिष्ठित करताना पाहता येणार आहे. मंत्र मुग्ध करणारे आदियोगी दिव्य दर्शन – आदियोगी, म्हणजेच प्रथम योगीची कथा सांगणारा थ्री डी लेसर शो यामध्ये समाविष्ट आहे. मध्यरात्रीचे शक्तिशाली ध्यान आणि सद्गुरूंसोबत सत्संगामध्ये सामील होता येणार आहे. नामवंत कलाकारांच्या संगीत आणि नृत्य सादरीकरणाचा आनंद लुटता येणार आहे. तसेच रोमहर्षक अग्निनृत्य आणि आणखी बरेच काही कार्यक्रम यादरम्यान होत आहेत.