Friday, May 3, 2024
Homeनाशिकमनपाच्या 20 अंगणवाड्याही होणार स्मार्ट

मनपाच्या 20 अंगणवाड्याही होणार स्मार्ट

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महापालिकेच्या शाळांमध्ये स्मार्ट स्कूल उपक्रम उभारणी अंतिम टप्प्यात आलेली असताना, आता क्वॉलिटी सिटी अभियानांतर्गत महापालिकेच्या अंगणवाड्या स्मार्ट करण्यात येेणार आहेत. या प्रकल्पासाठी 20 अंगणवाड्यांची निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

आंगणवाडीतील बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी त्यांना डिजिटल बोर्डासह स्मार्ट साहित्य पुरविण्यात येणार आहेत. त्याबाबत क्वालिटी सिटी अंतर्गत अंगणवाडी कर्मचार्‍यांनाही प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे क्वॉलिटी सिटी अभियानाचे समन्वयक तथा महापालिकेचे समाजकल्याण विभागाचे उपआयुक्त प्रशांत पाटील यांनी सांगितले.

क्वॉलिटी सिटी अभियानांतर्गत मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मुख्य कार्यालयात क्वॉलिटी सिटी अभियानांतर्गत समावेश असणार्‍या सर्व संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली.क्वॉलिटी सिटी अभियानांतर्गत शहरात क्वॉलिटी वॉर्ड तयार केले जाणार आहेत. स्वरूपा सुरवसे यांनी यासंदर्भातील माहिती बैठकीत दिली. 4 हजार 500 बांधकाम कामगारांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याची माहिती क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी दिली. संदीप कुयटे यांनी श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानतर्फे घेण्यात आलेल्या प्रशिक्षणाबाबत, तर स्वरूप यांनी होम कंपोस्टिंगबाबत माहिती दिली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

प्रसारक समाज संस्थेच्या मुख्य कार्यालयात नुकतीच पार पडली. यात मनपाच्या अंगणवाड्या स्मार्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पासाठी महापालिकेच्या मालकीची इमारती असलेल्या तसेच विद्यार्थी संख्या 50 हून अधिक असलेल्या 20 अंगणवाड्यांची निवड करण्यात आली आहे. या अंगणवाड्यांमध्ये डिजिटल बोर्ड, दृकश्राव्य माध्यमातून शिक्षण देता येणारे स्मार्ट शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक खेळ आदी साहित्य पुरविले जाणार असून, अंगणवाडी कर्मचार्यांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे. याप्रसंगी मविप्र सरचिटणीस अँड. नितीन ठाकरे, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे जितूभाई ठक्कर, क्वॉलिटी सिटीचे समन्वयक फोरमचे आशिष कटारिया, प्रशांत पाटील, नाशिक सिटीझन विक्रम सारडा, हेमंत राठी, आयएमएचे डॉ. श्रेया कुलकर्णी, नरेंद्र कुलकर्णी, इंडस्ट्रिअल को-ऑपरेटिव्ह इस्टेटचे सचिन अहिरराव आदी उपस्थित होते.

इंदूरच्या धर्तीवर रोडमॅप

क्वॉलिटी सिटी मिशन ही नाशिक शहरात एक लोकचळवळ बनावी व त्यातून शहर इंदूर शहराच्या धर्तीवर एक सुंदर शहर बनावे, यासाठी रोडमॅपनुसार काम करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला गेला. तसेच सामाजिक, शैक्षणिक व अन्य क्षेत्रांतील काम करणार्‍या संस्था यांनी अभियानात योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या