Thursday, October 1, 2026
Homeमुख्य बातम्यामहात्मा ज्योतिबा फुले यांच्या समग्र साहित्याचा सात भाषांमध्ये अनुवाद करणार

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समग्र साहित्याचा सात भाषांमध्ये अनुवाद करणार

सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

- Advertisement -

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांचे  समग्र वाङमय हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगु, बंगाली आणि गोर बंजारा या सात भाषांमध्ये अनुवादित करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी येथे केली.

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगु, बंगाली आणि गोर बंजारा या भाषांसाठी साहित्य अकादमी कार्यरत आहेत. या साहित्य अकादमींच्या माध्यमातून साहित्यिक आदान-प्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी आज प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे एक  दिवसीय अनुवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन करताना शेलार यांनी वरील घोषणा केली.

मराठी भाषेतील दर्जेदार वाड्मय अन्य भाषांमध्ये गेले पाहिजे तसेच अन्य भाषांमधील
वाड्मय आपल्या भाषेत आले पाहिजे. भाषेला समृद्ध करण्यासाठी अशा प्रकारचे आदन प्रदान महत्वाचे असून यावर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष असून भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार  यानिमित्ताने विविध उपक्रम राबविणार आहे. याचाच एक भाग म्हणून महात्मा  फुले यांचे वाङमय आपण या साहित्य अकादमीतर्फे सात भाषांमध्ये अनुवाद करु. त्यासाठी आवश्यक ते सगळी मदत सरकार करेल, असे शेलार यांनी जाहीर केले.

या उपक्रमातंर्गत महात्मा ज्योतिबा फुले चरित्र साधन प्रकाशन समितीने २०१२ साली प्रकाशित केलेले महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाडमय हा ८६१ पानांचा ग्रंथ सात भाषांमध्ये अनुवादीत करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

रायगडच्या दिवेआगर समुद्रात आळंदी येथील ८ विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

0
पुणे |प्रतिनिधी| Pune रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या पुण्याच्या आळंदी येथील खाजगी क्लासच्या आठ विद्यार्थ्यांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी...