Saturday, August 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र-हेसन भागीदारीतून गुंतवणूक,रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना मिळेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र-हेसन भागीदारीतून गुंतवणूक,रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई | वृत्तसंस्था

- Advertisement -

महाराष्ट्र आणि जर्मनीतील हेसन राज्य यांच्यामधील परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हेसन राज्याचे अध्यक्ष बोरीस ऱ्हेइन यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत स्वाक्षरी केली.

जर्मनीतील हेसन राज्य आणि महाराष्ट्र यांच्यातील भागीदारी ही दोन आर्थिक सक्षम राज्यांमधील सहकार्य आहे. हेसन हे महाराष्ट्रासाठी जर्मनी आणि युरोपमधील तर महाराष्ट्र हे हेसनसाठी भारत आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशातील प्रवेशद्वार ठरेल, महाराष्ट्र-हेसन भागीदारीतून गुंतवणूक, नवोन्मेष, रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना मिळेल आणि नागरिकांसाठी नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

विश्वास, ज्ञान, व्यापार, नवोन्मेष आणि लोकांमधील संबंधांच्या भक्कम पायावर भारत-जर्मनी भागीदारी उभी आहे. राष्ट्रीय स्तरावरील सहकार्याला आता राज्यस्तरावरील आर्थिक भागीदारीची जोड मिळत असून महाराष्ट्र आणि हेसन या दोन्ही राज्यांतील आर्थिक सामर्थ्य, औद्योगिक प्रगती आणि नवोन्मेष क्षमता यामुळे हे सहकार्य अधिक बळकट होणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी.अन्बळगन, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, कौशल्य विकास आयुक्त अमित सैनी, सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे यांच्यासह जर्मनीच्या हेसन राज्याचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

ताज्या बातम्या

लिपिक आणि लघुलेखक पदाची फेरपरीक्षा घ्या – जयंत पाटील यांचे उच्च...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत लिपिक आणि लघुलेखक पदांच्या भरती प्रक्रियेदरम्यान १६ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या टायपिंग टेस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी...