Wednesday, June 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजयेवला शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

येवला शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

येवला | प्रतिनिधी Yeola

- Advertisement -

शहर आणि तालुका परिसरात गुरुवारी, (दि. २१) सायंकाळी अचानक हवामानात बदल झाला. सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान काळे ढग दाटून आले आणि काही क्षणांतच सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. अवघ्या काही मिनिटांच्या या वादळी पावसाने शहरासह ग्रामीण भागात मोठे नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले.

वादळाने शहरासह तालुक्यातील अनेक मुख्य रस्त्यांवर झाडांच्या मोठ्या फांद्या कोसळल्या. काही ठिकाणी किरकोळ पडझड झाल्याच्या घटनाही घडल्या. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाली. वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर पडल्याने आणि काही वीज खांब हलल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शहर व परिसरातील वीज पुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला होता.

सध्या आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना झाडांवरील काढणीस आलेले आंबे जोरदार वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीवर कोसळले. अनेक फळे फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच उन्हाळी भाजीपाला पिकांनाही फटका बसला आहे. दिवसभराच्या कडक उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी अचानक आलेल्या वादळामुळे बाजारपेठांमध्ये धावपळ उडाली.

ताज्या बातम्या

संपादकीय : शांततेचे ढग, की ट्रम्प यांची खेळी?

0
पश्चिम आशियाला युद्धाच्या भयंकर ज्वाळांमध्ये होरपळून टाकणारा अमेरिका-इराण संघर्ष तब्बल १०७ दिवसांच्या रक्तरंजित थरारानंतर अखेर थांबला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ८०व्या...