Tuesday, October 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSimhastha Kumbhmela 2027 -सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १,०६३ कोटी रुपयांच्या कामांच्या प्रस्तावाला मंजुरी

Simhastha Kumbhmela 2027 -सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १,०६३ कोटी रुपयांच्या कामांच्या प्रस्तावाला मंजुरी

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा विकास समितीची बैठक पार पडली. या बैठकीत एकूण १८ हजार १३० कोटी रुपयांच्या कामांना बुधवारी मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा विकास समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यात नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १ हजार ६३ कोटी रूपयांच्या कामांच्या प्रस्तावाला बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

- Advertisement -

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना उत्तम सोयी-सुविधा मिळण्यासाठी प्रस्तावित पायाभूत सुविधांची कामे गतीने करावीत. भाविकांसाठी वाहनतळ, पाणीपुरवठा, विद्युतविभाग, आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन, मुख्य नियंत्रण कक्ष यासाठी १ हजार ६३ कोटी रूपयांच्या कामांचे प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली असून ही कामे गतीने पूर्ण करावीत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी 369 उमेदवारी अर्ज

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या महिन्याभरापासून गाजत असलेल्या अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार (दि. 5) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 903 अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज...