Tuesday, November 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदेवेंद्र फडणवीसांच्या नादाला लागू नका अन्यथा...; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा

देवेंद्र फडणवीसांच्या नादाला लागू नका अन्यथा…; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा

मुंबई | Mumbai
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी सतेज पाटलांच्या राजकीय वागणुकीवर आणि डी. वाय. पाटील कुटुंबाच्या संपत्तीवर थेट सवाल उपस्थित करत अत्यंत आक्रमक शब्दांत समाचार घेतला. काँग्रेसच्या आणीबाणीच्या काळात माझ्या बायकोच्या घरातील चार लोक तुरूंगात होते. कुणाला बोलण्याचे स्वातंत्र्य नव्हते, लिहायला बंदी होती आणि आता हा बंटी पाटील आम्हाला घटना-लोकशाही शिकवतोय. अरे बंटी तू अजून बंटीच राहिला आहे… अशी बोचरी टीका भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. देवंद्र फडणवीस तेल लावलेला पैलवान आहे, त्यांच्या नादाला लागू नका अन्यथा एका दिवसात साम्राज्य उधळून टाकू, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांना दिला.

बंटी पाटील नावाप्रमाणे बंटीच राहिले
चंद्रकांत पाटील यांनी समविचारी आघाडीचे नेतृत्त्व करणाऱ्या सतेज पाटील यांच्यावर तुफान टीका केली. मविआ म्हणजे बंटी पाटील, बंटी पाटील यांच्यासोबत उद्धव ठाकरेंची शिवसेना कुठे, शरद पवारांची राष्ट्रवादी कुठे दिसली नाही. बंटी पाटीलचा स्वभावच आहे, जिथे जाईल तिथे सगळ्यांना पायाखाली घ्यायचं, का तर म्हणे मला केव्हातरी मुख्यमंत्री व्हायचंच केव्हातरी. मुख्यमंत्री व्हायचंय ते ठीक पण तशी समजही लागते. मी लोकांना सांगतो, मुन्ना साहेब म्हणा किंवा धनंजय महाडिक म्हणा ते राज्यसभा सदस्य आहेत. बंटी पाटील हे त्यांच्या नावाप्रमाणे बंटीच राहिले, त्यांचा बंटी साहेब झालाच नाही, अशा शब्दांत भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांची खिल्ली उडवली. ते मंगळवारी शिरगाव येथील गोकुळ चौकात महायुतीकडून आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.

- Advertisement -

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नाशिककरांवर अग्नितांडवाचे सावट; दिवसभरात तब्बल ‘इतक्या’ आगीच्या घटना

आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांनी लिहण्यावर, बोलण्यावर, छापण्यावर बंदी घातली
बंटी पाटील गोकुळच्या निवडणुकीत लोकशाहीची तत्त्वे पायदळी तुडवण्यात आल्याचे म्हणतात. पण गोकुळच्या निवडणुकीत तुमचे 13 संचालक निवडून आले, तुम्हाला 4900 मतं मिळाली. महायुतीचे 12 संचालक निवडून आले, आम्हाला 5100 मतं मिळाली. तुम्ही ज्या पक्षाचे आहात त्याच्या पूर्वजांपर्यंत गेल्यास तुम्ही लोकशाही कशी पायदळी तुडवली आहे, हे समजून येईल. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांनी लिहण्यावर, बोलण्यावर, छापण्यावर बंदी घातली. 20 लाख लोकांना तुरुंगात टाकले आणि आज त्याच पक्षाचे बंटी पाटील आम्हाला लोकशाही शिकवणार का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

आपली उंची पाहून बोला, आम्हाला डिवचले तर आम्ही सोडणार नाही
डी. वाय. पाटील कुटुंबाच्या संपत्तीवर चंद्रकांत पाटील यांनी थेट प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, एकेकाळी डी. वाय. पाटील हे स्कूटरवरून फिरत होते. आज एवढी अफाट संपत्ती कुठून आली? याचे उत्तर त्यांनी द्यावे. हे सर्व स्वतःसाठी मलाई काढण्याचे काम चालले आहे. तुम्ही स्वतः काचेच्या घरात राहता, त्यामुळे दुसऱ्यांच्या घरावर दगड मारणे थांबवा. आपली उंची पाहून बोला, आम्हाला डिवचले तर आम्ही सोडणार नाही, असा सज्जड इशारा त्यांनी दिला.

सोनिया गांधींच्या फोनचा गौप्यस्फोट आणि जुन्या आठवणी
जनादेश पायदळी तुडवून जेव्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केले गेले, तेव्हा सोनिया गांधींशी एक कॉल झाला होता. त्या कॉलवर बंटी पाटलांनी सोनिया गांधींना कसा दम दिला होता, हे मला सर्व माहिती आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. त्याचं कॉल रेकॉर्डिंग आपल्याकडे असल्याचे पाटील म्हणाले.

ताज्या बातम्या

आगीच्या

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नाशिककरांवर अग्नितांडवाचे सावट; दिवसभरात तब्बल ‘इतक्या’ आगीच्या घटना

0
नाशिक | प्रतिनिधीआनंद आणि रोषणाईचा सण असलेल्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नाशिककरांवर अग्नितांडवाचे सावट पाहायला मिळाले. फटाक्यांची आतषबाजी आणि रोषणाईच्या आनंदात शहरात दिवसभरात तब्बल ३९ ते...