Sunday, May 5, 2024
Homeजळगावजिल्ह्यात रविवारी आढळले 23 कोरोनाबाधित रुग्ण

जिल्ह्यात रविवारी आढळले 23 कोरोनाबाधित रुग्ण

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जिल्ह्यात रविवारी पुन्हा नव्याने 23 रुग्ण आढळुन आले आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 54 हजार 525 इतकी झाली आहे. तर रविवारी दिवसभरात एका रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

- Advertisement -

रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 14, जळगाव ग्रामीणमधील 02, भुसावळ येथील 03, अमळनेरातील 00 , चोपडा येथील 00, पाचोरा येथील 00, भडगावातील 00, धरणगाव 00, यावल येथील 01, एरंडोल येथील 00, जामनेरातील 00, रावेर येथील 00, पारोळा येथील 00, चाळीसगावमधील 00, मुक्ताईनगरातील 00, बोदवड येथील 01, परजिल्ह्यातील 02 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 52 हजार 677 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील 35 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 551 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रविवारी एका रुग्णाचा मृत्यू डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात झाला आहे. मृत्य झालेल्यामध्ये यावल तालुक्यातील 68 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या