Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रपरप्रांतीयांना गावी जाण्यासाठी पुण्यातून 23 रेल्वे

परप्रांतीयांना गावी जाण्यासाठी पुण्यातून 23 रेल्वे

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तरांचल, झारखंड, पश्चिम बंगाल अशा विविध राज्यांमधील पुण्यात अडकलेल्या मजूर, कामगारांना मूळ गावी सोडण्यासाठी येत्या आठवडाभरात 23 रेल्वे गाडया पुण्यातून पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी दिली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील उद्योग, व्यवसाय सुरू होत असल्याने आतापर्यंत 300 मजुरांनी मूळ गावी जाण्यास नकार दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

ते म्हणाले, टाळेबंदीमुळे पुण्यात अडकलेल्या मजूर, कामगारांना सोडण्यासाठी संबंधित राज्यांशी संपर्क करण्यात येत आहे. त्यानुसार मजुरांची यादी करण्यात आली असून दररोज दोन ते तीन यानुसार येत्या आठवडयात 23 रेल्वे गाडया पुण्यातून विविध राज्यांत पाठवण्यात येतील. तसेच पुण्यातून महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाण्यासाठी एसटी आणि खासगी बसगाडयांची सोय करण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांत 150 बसगाडया सोडण्यात येणार आहेत.

टाळेबंदीमुळे पुण्यात एक लाख आठ हजार 608 मजूर, कामगार अडकले असून ही संख्या प्रशासनाने शोधलेल्या व्यक्तींची आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेशातील 25 हजार 816, बिहारमधील 13 हजार, मध्य प्रदेशातील दहा हजार 602, पाच हजार 168 झारखंड आणि इतर अन्य राज्यांमधील आहेत. आतापर्यंत पुण्यातून बारा हजार मजूर, कामगार त्यांच्या मूळगावी गेले आहेत. त्यामध्ये मध्य प्रदेशात चार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथे प्रत्येकी एक रेल्वे गाडी सोडण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या