Monday, May 20, 2024
Homeदेश विदेशTerrorist Attack : दहशतवाद्यांचा शाळेवर हल्ला; २५ विद्यार्थी ठार

Terrorist Attack : दहशतवाद्यांचा शाळेवर हल्ला; २५ विद्यार्थी ठार

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

गेल्या काही वर्षांपासून आफ्रिकन देश (African Countries) दहशतवादाच्या विळख्यात सापडल्याचे दिसत आहे. या देशांमध्ये दररोज दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडत असल्याने येथील नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. अशातच आता आफ्रिकन देशातील युगांडामध्ये एका शाळेवर दहशतवाद्यांनी (Terrorists) हल्ला (Attack) केल्याची घटना घडली आली आहे…

- Advertisement -

संतापजनक! भर रस्त्यात पेट्रोल टाकून महिलेला पेटवलं

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (डीआरसी) येथील सीमेपासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर असलेल्या मपोंडवे येथील लुबिरिरा माध्यमिक विद्यालयात (Lubirira Secondary School) हा हल्ला झाला असून यात २५ विद्यार्थ्यांचा मृत्यू (Death of Students) झाला आहे. तसेच या हल्ल्यात ८ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बवेरा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Nashik Accident News : ट्रेलरखाली दबून दुचाकीवरील मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू

दरम्यान, युगांडाची (Uganda) दहशतवादी संघटना अलायड डेमोक्रॅटिक फोर्सेस (एडीएफ) मपोंडवे (Mpondwe) येथील लुबिरिरा माध्यमिक विद्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सामील असल्याचे बोलले जात आहे. तसेच ही दहशतवादी संघटना (Terrorist Organization) डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये असून इस्लामिक दहशतवादी संघटना आयएसआयएसशी तिचे संबंध असल्याचे समोर आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Monsoon Update : मान्सून पुन्हा लांबणीवर; आता ‘या’ तारखेनंतर कोसळण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

- Advertisment -

ताज्या बातम्या