Thursday, May 2, 2024
Homeजळगावसाखरपुडा कार्यक्रमातून 25 तोडे सोने लंपास

साखरपुडा कार्यक्रमातून 25 तोडे सोने लंपास

चोपडा । प्रतिनिधी chopada

साखरपुडाच्या कार्यक्रमातून होणार्‍या भावी वधूचे पर्समध्ये ठेवलेले 25 तोडे सोन्याचे दागिने ठेवलेली पर्स अज्ञात चोरट्याने हात की सफाई करत लंपास करून वर्‍हाडींच्या गर्दीतून पोबारा केल्याची घटना सोमवारी दुपारी 12 ते 1 वाजेच्या सुमारास अकुलखेडा (ता.चोपडा) येथील सौभाग्य मंगल कार्यालयात घडली.

- Advertisement -

चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील देवेंद्र नारायण चौधरी यांची सुकन्या तर भाजपचे कार्यकर्ते जितेंद्र नारायण चौधरी यांच्या पुतणीचा अकुलखेडा येथील चहार्डी फाट्यावरील सौभाग्य मंगल कार्यालयात दि.19 जून रोजी साखरपुडा होता. साखरपुडा कार्यक्रम आटोपला त्यानंतर भावी वधूने अंगावरील सोने,चांदीचे दागिने काढून पर्स मध्ये ठेवून पर्स मंडपात बसलेल्या आजीकडे सांभाळायला दिली असता अज्ञात चोरट्याने दागिन्यांची पर्स सोफ्याच्या कापडी कव्हर मध्ये गुंडाळून पोबारा केल्याची घटना घडली.

धाडसी चोरीच्या घटनेनंतर चोपडा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, पोलीस निरीक्षक के.के.पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साळवे,सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांचे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पाहणी करून माहिती घेतली. या बाबत देवेंद्र नारायण चौधरी (वय-35) रा. चुंचाळे (ता.चोपडा) यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवि कलम-379 नुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या