Sunday, July 26, 2026
Homeनाशिकदिंडोरी तालुक्यात पावसाचा जोर कायम; ओझरखेड धरण ओव्हरफ्लो

दिंडोरी तालुक्यात पावसाचा जोर कायम; ओझरखेड धरण ओव्हरफ्लो

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यात सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम असून, परिसर जलमय झाला आहे. तालुक्यातील 50 हून अधिक गावे आणि वणी व दिंडोरी शहरांना पाणीपुरवठा करणारे महत्त्वाचे ओझरखेड धरण पूर्ण क्षमतेने भरून सायंकाळी ओव्हरफ्लो झाले आहे. 90 टक्के भरलेल्या या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

दिंडोरी तालुक्यातील इतर धरणांमध्येही मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार ओझरखेड धरण 100% भरले असून पुणेगाव धरण 73.48 टक्के, वाघाड धरण 68.87 टक्के आणि करंजवन धरण 64.02 टक्के भरले आहे. याशिवाय तीसगाव धरण 51.56 टक्के तर पालखेड धरणात 59 टक्के पाणीसाठा झाला आहे. पावसाचा असाच जोर राहिल्यास पुढील दोन ते तीन दिवसांत तालुक्यातील इतर प्रमुख धरणेही पूर्ण भरून ओव्हरफ्लो होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
.
सततच्या पावसामुळे आणि धरणांमधून सुरू असलेल्या विसर्गामुळे नदी-नाल्यांना पुर आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पूरपरिस्थिती विचारात घेऊन नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने प्रवास आणि वाहतूक शक्यतो टाळावी, तसेच प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

दिंडोरी तालुक्यात पावसाची जबरदस्त बॅटिंग सुरू असून तालुक्याच्या धरणांमध्ये कमालीची पाणी पातळी वाढल्याने धरणांमधून सध्या नदीपात्रांमध्ये विसर्ग करण्यात येत आहे.
सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे दिंडोरी स्थानिक धामण नदीला पूर असल्याने पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगाने वाहत असून शहरातील मुख्य वाहतुकीसाठी असणारा पूल देखील बंद करण्यात आला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने या पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करून ती दुसर्‍या पर्यायी मार्गाने वळवली होती. याशिवाय दिंडोरी ते पालखेड रस्त्यावर सुरू असणार्‍या फुलाचे काम देखील रेंगाळले असल्याने पर्यायी रस्ता सुरू करण्यात आला होता परंतु हा रस्त्याची देखील या पावसाने वाट लावली आहे. त्यामुळे नागरिकांना सध्या दिंडोरी शहरामधून मार्गक्रमण करावा लागत आहे.


सुरू असलेल्या पावसामुळे पेरणी केलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे, मात्र तालुक्यात अजूनही पेरण्या बाकी असल्याचे शेतकर्‍यांकडून बोलले जात आहे. ज्या शेतकर्‍यांनी टोमॅटो, कोबी, फ्लावर पिकाची लागवड केली आहे त्या पिकांना या पावसामुळे जीवदान मिळालेले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये ‘कभी खुशी कभी गम’ असे चित्र पाहावयास मिळत आहे. या पावसामुळे सध्या पालखेड धरण 59 टक्के भरले असून या धरणा धरणाचे आठ गेट अर्ध्या फुटाणे वर करून कादवा नदी पात्रात 2052 पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

खतवड-आंबे-दिंडोरी पुल पूर्णपणे पाण्याखाली
बाणगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला भीषण महापूर आला आहे. पाण्याचा प्रचंड प्रवाह वाढल्याने बाणगंगा नदीने आपले पात्र सोडले असून, खतवड-आंबे-दिंडोरी पुल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

​पुराचे पाणी आसपासच्या शेतात व सखल भागात शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. परिस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा (हाय अलर्ट) इशारा दिला आहे. आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा आणि नदीपात्राजवळ किंवा पुलावर जाण्याचे धाडस करू नये, असे आवाहन महसूल व पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ मध्ये नाशिक जिल्ह्यातील जलसंवर्धन...

0
नाशिक । जिमाका वृत्तसेवा Nashik प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' केली. या उपक्रमात नाशिक जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या जलसंवर्धन उपक्रमाची त्यांनी दखल घेत...