Thursday, October 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : नाशिकमध्ये २८ जूनला 'मिशन ग्रीन मान्सून' अभियानाचा शुभारंभ

Nashik News : नाशिकमध्ये २८ जूनला ‘मिशन ग्रीन मान्सून’ अभियानाचा शुभारंभ

सक्रिय लोकसहभागातून हरित नाशिक साकारण्याचा संकल्प

- Advertisement -

नाशिक । जिमाका वृत्तसेवा Nashik

प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि नागरिक यांच्या सक्रिय लोकसहभागातून हरित नाशिक साकारण्याचा संकल्प करण्यात आला असून, या अभियानाचा शुभारंभ २८ जून रोजी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होणार आहे. या अभियानात प्रत्येक नाशिककराने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियेाजन सभागृहात ‘मिशन ग्रीन मान्सून’ अभियानाच्या नियोजनासाठी आयोजित जिल्हास्तरीय समन्वय बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी सीमा आहिरे, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, मंत्री गिरीश महाजन यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव, वनाधिकारी रणदिवे, मनपा उद्यान निरीक्षक विवेक भदाने, वृक्षमित्र शेखर गायकवाड, चंदू पाटील,जगबिर सिंग,मनोज साठे,वैभव देशमुख,मनीष बाविस्कर,भारती जाधव,राम खुर्दळ,भारत पिंगळे,शिवाजी धोंडगे,सागर बैरागी,गौरव देशमुख, सोनल दगडे यांच्यासह शहरातील पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, सातपूर एमआयडीसी परिसरात असलेल्या देवराई ( फाशीचा डोंगर) या ठिकाणी वृक्षमित्र शेखर गायकवाड यांच्या माध्यमातून झाडांची लागवड करण्यात आली आहे, आजही या परिसरात वृक्ष लागवडीचे काम सुरू आहे. 28 जून 2026 रोजी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मिशन ग्रीन मान्सून अंतर्गत देखील दोन हजार झाडांचे रोपण या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यासोबतच शिंदे ग्रामपंचायतचे सरपंच बाजीराव जाधव यांनी देखील दोन हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून 28 जून रोजी ग्रामपंचायत परिसरात दोन हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. तसेच शहरातील विविध ठिकाणावरून वृक्ष लागवडीसाठी अनेक नागरिकांनी मागणी केलेली आहे, या जागेवर देखील महानगरपिालका प्रशासनामार्फत रोपे पुरवण्यात येणार आहे. अशाप्रकारे सुमारे पाच ते सहा हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट येत्या रविवारी सुरू होणाऱ्या मिशन ग्रीन मान्सून च्या माध्यमातून ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

“महानगरपालिका व परिसरात सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी योग्य जागा उपलब्ध असेल अशा परिसरातून नागरिकांनी देखील मागणी केली तर त्यांना झाडे उपलब्ध करून दिले जाणारआहेत. याकरिता सोबतचा QR कोड स्कॅन करून आपली मागणी नोंदवायची आहे. जागा सुयोग्य असल्यास प्रशासनामार्फत या ठिकाणी मोफत झाडे पुरवली जाणार आहेत, तरी या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन हरित नाशिक चळवळीत सहभाग घ्यावा
–कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज घेण्यासाठी झुंबड; दाखल करणार्‍यांची मात्र प्रतीक्षा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, अर्जांची विक्री मोठ्या प्रमाणात होत...