Thursday, May 2, 2024
Homeनगरघरफोडून 27 हजाराचा ऐवज लंपास

घरफोडून 27 हजाराचा ऐवज लंपास

अहमदनगर|Ahmedagar

बंद घर फोडून चोरट्यांनी 20 हजार रूपयांची रोख रक्कम व सोन्याची अंगठी असा 27 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला.

- Advertisement -

वडगाव गुप्ता परिसरातील आंधळे चौकात ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशिला अशोक मोरे (रा. वडगाव गुप्ता ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या घरी कोणी नसताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडले. घरातील सामानांची उचकापाचक करून रोख रक्कम व सोन्याची अंगठी लंपास केली. फिर्यादी घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. याप्रकरणी पुढील तपास सहायक फौजदार महाजन करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या