Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्र7 दिवसांत 279 मुंबई पोलिस करोना बाधित

7 दिवसांत 279 मुंबई पोलिस करोना बाधित

मुंबई –

मुंबई पोलीस दलातील एका पोलीस अधिकार्‍यांचा सोमवारी करोनामुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सात दिवसांत मुंबई पोलीस दलातील 279 पोलीस कर्मचार्‍यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पोलीस दलाची चिंता वाढली आहे.

- Advertisement -

11 एप्रिलपर्यंत मुंबईतील करोनाबाधित पोलिसांची संख्या 7 हजार 997 होती. त्यापैकी 7 हजार 442 पोलिसांची करोनातून मुक्तता झाली आहे. तर सध्या 454 पोलीस कर्मचार्‍यांवर उपचार सुरु आहेत.

तर आतापर्यंत 101 मुंबई पोलिसांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

70 टक्के पोलिसांनी घेतली करोना लस

70 टक्के मुंबई पोलिसांनी करोनाची लस घेतली आहे. तर 11 एप्रिलपर्यंत 30 हजार 756 पोलिसांना करोनाची लस घेतली. त्यात 2 हजार 690 पोलीस अधिकारी आणि 28 हजार 66 पोलीस शिपायांचा समावेश आहेे. तर 17 हजार 351 पोलीस कर्मचार्‍यांनी करोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यात 1 हजार 325 पोलीस अधिकारी आणि 16 हजार 26 पोलीस शिपायांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या