Monday, March 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजआज रंगणार ‘बागलाण भूषण’ पुरस्कार सोहळा

आज रंगणार ‘बागलाण भूषण’ पुरस्कार सोहळा

अभिनेत्री निशिगंधा वाड यांची प्रमुख उपस्थिती

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

दैनिक ‘देशदूत’ आयोजित आणि आमदार दिलीप बोरसे मित्र मंडळ प्रायोजित ‘बागलाण भूषण पुरस्कार सोहळा-२०२६’ आज शनिवारी (दि.२८) सटाणा शहरात होणार आहे. या दिमाखदार सोहळ्याचे प्रमुख आकर्षण प्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड या असणार असून कार्यक्रमासाठी आमदार दिलीप बोरसे यांची देखील उपस्थिती लाभणार आहे.

हा गौरव सोहळा सटाणा येथील बस स्टँडच्या मागे असलेल्या राधाई मंगल कार्यालय येथे सायंकाळी ठीक ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या गुणवंतांचा गौरव करण्यात येणार आहे.

सोहळ्याचे खास आकर्षण प्रिया कापडणे यांची संगीत रजनी असणार आहे. यावेळी भूषण कापडणे आणि आज्ञा तुपलोंढे यांची देखील उपस्थिती राहणार आहे. बागलाण तालुक्याच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारा हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी जय्यत तयारी केली असून, तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

IPL 2026 : राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आज आमनेसामने;...

0
गुवाहाटी । Guwahati इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ च्या हंगामातील तिसरा रोमांचक सामना आज राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात रंगणार आहे. आसाम...