Wednesday, June 10, 2026
Homeक्राईमAshok Kharat Crime News : 'नो चेक, ओन्ली कॅश'; नाशिकचा 'एप्स्टीन' खरातला धनादेशावर...

Ashok Kharat Crime News : ‘नो चेक, ओन्ली कॅश’; नाशिकचा ‘एप्स्टीन’ खरातला धनादेशावर अविश्वास

भक्तांच्या खिशातून उकळली लाखोंची रक्कम

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्वतःला कृष्णाचा अवतार म्हणवून घेणारा आणि दैवी शक्तींच्या गप्पा मारणारा स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरातच्या (Ashok Kharat) भोंदू‌गिरीचे एकेक थर आता उलगडू लागले आहेत. धक्कादायक म्हणजे, आलिशान जीवन जगणारा हा भोंदू केवळ १२ वी पास असून, त्याने आपल्या साम्राज्याची उभारणी करताना ‘दरबारा’त आर्थिक डिजिटल क्रांतीला बाहेरचा रस्ता दाखवला होता. दरबारात येणाऱ्या भक्तांकडून पैसे उकळताना खरातचा एकच नियम होता तो म्हणजे, ‘नो चेक, ऑन्ली कॅश’…. नाहीतर संताप अन् राग.

- Advertisement -

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरातने ‘व्यवसायात वृद्धी होईल’ असे सांगून उकळले तब्बल ‘इतके’ लाख; पीडितांचे एसआयटीला कॉल

काही फिर्यादी व तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार, खरात याने जाणीवपूर्वक ऑनलाइन व्यवहार (Online Payments) किंवा यूपीआय टाळले होते. एखाद्या भक्ताने श्रद्धेपोटी किंवा विश्वासाने किंवा काम सिद्धतेसाठी लाखांचा धनादेश देण्याचा प्रयत्न केला, तर खरात प्रचंड चिडायचा. “चेक दिला तर अंगठी ओरिजनल मिळणार नाही आणि तुमची प्रगती होणार नाही,” अशी भिती तो भक्तांना घालायचा. निव्वळ रोख रक्कम घेतल्यावरच ‘दैवी शक्ती’ कार्यरत होतात, असा बनाव त्याने रचला होता.

हे देखील वाचा : Ashok Kharat Case : नीलम गोऱ्हे देखील खरातला भेटल्या, नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील हॉटेलमध्ये…; तृप्ती देसाईंच्या आरोपाने खळबळ

एका पीडित व्यापाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याने खरातला चेक देण्याची तयारी दर्शवली होती, मात्र खरातने तो नाकारून व्यापाऱ्याने मित्राकडून उसने घेतलेले पैसे रोख स्वरूपातच स्विकारले. बदल्यात मिळालेल्या ‘पुष्कराज’ आणि ‘हिऱ्याच्या’ अंगठ्यांची तपासणी केली असता, त्या केवळ ५००० रुपयांच्या आणि तांब्याच्या धातूपासून बनवलेल्या निघाल्या. सोन्याच्या अंगठ्या आणि रोख रक्कम हडप करण्याचा हा खरातचा ठरलेला ‘पॅटर्न’ होता.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ; पोलीस कोठडी पुन्हा वाढवली, आज कोर्टात नेमकं काय घडलं? वाचा A टू Z माहिती

ब्लॅक मनीचा डोंगर कुठे?

केवळ रोख रकमेचा अट्टाहास धरण्यामागे खरातचा आर्थिक कट असल्याचे स्पष्ट होत आहे. कागदोपत्री कोणताही पुरावा राहू नये आणि तपास यंत्रणांपासून वाचता यावे, यासाठी त्याने ‘कॅश’वर भर दिला. आतापर्यंत किती भक्तांना त्याने अशा प्रकारे लुटले आणि जमा झालेली ही कोट्यवधींची रोकड त्याने कुठे गुंतवली किंवा कोणाकडे लपवून ठेवली, याचे गूढ कायम आहे. पोलीस आता या ‘कॅश सिंडिकेट’चा तपास करत असून, दरबारात राबता असणारे बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरातच्या मोबाईलचा ‘क्लोन’ तयार; बड्यांची गुपिते उघडणार, पंटरही रडारवर

ताज्या बातम्या

नरेंद्र

PM Narendra Modi: जनसेवा हीच सुशासनाची मोठी कसोटी…; पंतप्रधान नरेंद्र मोदींची...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए सरकारचा १२ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या...