Thursday, October 1, 2026
Homeसिंहस्थ कुंभमेळासिंहस्थ कुंभमेळ्यावर आधारीत छायाचित्र प्रदर्शनाला गर्दी

सिंहस्थ कुंभमेळ्यावर आधारीत छायाचित्र प्रदर्शनाला गर्दी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिक त्र्यंबकेश्वर येथे दर १२ वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन काल सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी या प्रदर्शनाची पाहणी केली.

रोटरी क्लब ऑफ नाशिक, नाईन हिल्स आणि नाशिक प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुदक्षिणा हॉलमधील डॉ. सुनंदा म.गोसावी आर्ट गॅलरीत काल पासून छायाचित्र प्रदर्शन सुरू झाले. ते 30 ऑगस्ट, 2026 पर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे.

आज छायाचित्र प्रदर्शनाला महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास, शिंदे शिवसेना गटनेते अजय बोरस्ते ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस उपायुक्त किरण चव्हाण, पोलीस सहाय्यक आयुक्त संदीप मिटके, माजी माहिती अधिकारी शिवाजी मानकर, शांतिगिरी महाराज आदींनी भेट दिली.

या प्रदर्शनात सिंहस्थ कुंभमेळ्यांतील दुर्मिळ, अप्रकाशित छायाचित्रे मांडण्यात आली आहेत. सन १९३२ पासूनच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ऐतिहासिक आठवणींचा अमूल्य ठेवा या छायाचित्रांमधून उलगड्यात आला आहे. बदलते नाशिक, साधू-संतांचे आखाडे, शाही स्नानाची परंपरा, भाविकांचा महासागर, धार्मिक विधी, तत्कालीन सामाजिक जीवन, कुंभमेळ्याचे बदलते स्वरूप या छायाचित्रांतून पाहावयास मिळणार आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra News : परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून होईल; काँग्रेस प्रभारी डॉ. सिरिवेल्ला...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai देशाची लोकशाही आणि संविधान संपवण्याची प्रक्रिया सुरु आहे. भाजपने निवडणूक आयोगाला स्वतःचे एजंट बनवले असून देशात चोरांचे राज्य आहे. मतचोरी,...