Thursday, July 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजत्र्यंबकेश्वरला दोन कार आगीच्या भक्ष्यस्थानी

त्र्यंबकेश्वरला दोन कार आगीच्या भक्ष्यस्थानी

सुदैवाने जीवित हानी नाही

त्र्यंबकेश्वर । Trimbakeshwar

त्र्यंबकेश्वर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज दुपारी एका भीषण आगीमुळे मोठा थरार पाहायला मिळाला. दोन कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या असताना, स्थानिक नागरिक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या धाडसामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे.

​त्र्यंबकेश्वरमधील अत्यंत वर्दळीचा भाग मानल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज एका उभ्या असलेल्या वाहन क्रमांक MH03AW4327 ला अचानक आग लागली.हा परिसर नेहमीच वर्दळीचा असल्याने काही काळ नागरिकांची मोठी धावपळ उडाली. आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की, शेजारीच उभ्या असलेल्या बलेनो कार क्रमांक HP38E4653 ने ही पेट घेतला.बलेनो कार सीएनजी (CNG) असल्याची माहिती मिळताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

​घटनेची माहिती मिळताच त्र्यंबक नगरपरिषदेचे कर्मचारी नितीन शिंदे, विशाल मैडा आणि संजय सोनवणे यांनी तत्काळ अग्निशामक वाहन घटनास्थळी आणले.त्यांना स्थानिक रहिवासी गणेश खैरनार, योगेश भांगरे, कृष्णा शिंदे, शुभम ठाकरे, राहुल महाले, कुणाल सोनवणे आणि सागर पंजाबी यांनी मोलाची साथ दिली. या सर्वांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

​वर्दळीचा चौक असल्याने आग पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अशा वेळी पोलीस हवालदार सचिन जाधव आणि पोलीस शिपाई श्रावण साळवे यांनी घटनास्थळी धाव घेत गर्दीवर नियंत्रण मिळवले आणि सुरक्षेला प्राधान्य दिले.या सर्वांच्या तत्परतेमुळे सीएनजी कारचा स्फोट होण्यापूर्वीच आग विझवण्यात यश आले.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या आगीत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन गर्दीच्या ठिकाणी दाखवलेल्या या प्रसंगावधानाबद्दल नगरपरिषद कर्मचारी आणि स्थानिक तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ताज्या बातम्या

Thackeray Brothers News : NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधू एकत्र; २६ जुलैला...

0
मुंबई | Mumbai नीट परीक्षेतील पेपरफुटी, विद्यार्थ्यांवर झालेला लाठीहल्ला आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जंतरमंतरवर...