Monday, November 9, 2026
HomeनगरPathardi : भगवानगडाच्या पायथ्याशी विहिरीत आढळले आठ दुचाकीचे सांगाडे

Pathardi : भगवानगडाच्या पायथ्याशी विहिरीत आढळले आठ दुचाकीचे सांगाडे

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी तालुक्यातील भगवानगडाच्या (Bhagwangad) पायथ्याशी घोगस पारगाव रस्त्यालगत असलेल्या जुन्या विहिरीमध्ये (Well) तब्बल आठ दुचाकीचे सांगाडे व अवशेष आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विहिरीतील (Well) पाणी आटल्याने गाळ काढण्याचे काम सुरू असताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यामध्ये आठ मोटारसायकलींचे सांगाडे (Motorcycle Frames) व त्यांचे सुटे भाग आढळून आले असून पोलिसांनी ते ताब्यात घेतले आहेत.

- Advertisement -

श्री क्षेत्र भगवानगडाला पाणीपुरवठा करण्यासाठी या जुन्या विहिरीचा वापर केला जात होता. मात्र, दुष्काळी (Drought) परिस्थितीमुळे विहिरीतील पाणी आटले होते. त्यामुळे विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. हा गाळ काढण्याचे काम सुरू असताना कामगारांना अचानक दुचाकीचे सांगाडे आणि सुटे भाग दिसून आले. यानंतर संबंधित प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दुचाकीची व अवशेष ताब्यात घेतले. विहिरीत (Drought) आढळलेल्या दुचाकीची अवस्था अत्यंत खराब झाली असून अनेक वर्षे पाण्यात आणि गाळात राहिल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात गंज चढला आहे. प्राथमिक पाहणीत या दुचाकी हिरो होंडा आणि बजाज कंपनीच्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, त्यांची नेमकी ओळख पटविणे कठीण झाले आहे.

दरम्यान, या दुचाकी चोरीच्या असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून चोरीनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्या विहिरीत (Drought) टाकण्यात आल्या असाव्यात, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या दुचाकी नेमक्या कोणाच्या आहेत, त्या कधी आणि कोणी विहिरीत टाकल्या, तसेच त्यांचा चोरीच्या घटनांशी काही संबंध आहे का, याचा तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : घरबसल्या करा रासायनिक खतांचे बुकिंग

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अनुदानित रासायनिक खतांची खरेदी अधिक सुलभ, पारदर्शक आणि नियोजनबद्ध करण्यासाठी केंद्र शासनाने विकसित केलेली फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल (एफएफएस) प्रणाली 22 ऑक्टोबरपासून...