Sunday, November 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजEarthquak : नागपूरमध्ये २.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या सौम्य भूकंपाची नोंद

Earthquak : नागपूरमध्ये २.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या सौम्य भूकंपाची नोंद

नागपूर :

- Advertisement -

नागपूर जिल्ह्यात आज (८ नोव्हेंबर) सौम्य भूकंपाची नोंद झाली आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (NCS) अधिकृत माहितीनुसार, दुपारी २ वाजून १७ मिनिटांनी हा भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता २.६ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या नोंदीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नागपूरपासून सुमारे २७ किलोमीटर दक्षिण-दक्षिणपूर्व दिशेला होता. या भूकंपाची खोली जमिनीखाली सुमारे ५ किलोमीटर असल्याचे नोंदविण्यात आले आहे. भूकंपाची नोंद केंद्राकडून तपासणी करून प्रमाणित करण्यात आली आहे.

२.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप सौम्य स्वरूपाचा असल्याने त्याची तीव्रता तुलनेने कमी आहे. या भूकंपाचे धक्के नेमक्या कोणत्या भागात जाणवले आणि नागरिकांना त्याची जाणीव झाली का? यांची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही दरम्यान, या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

ताज्या बातम्या

Muharat Trading : दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजारात विशेष ट्रेडिंग; सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह...

0
मुंबई : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आज (८ नोव्हेंबर) भारतीय शेअर बाजारात विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्र पार पडले. नवीन संवत्सर २०८३ च्या प्रारंभानिमित्त गुंतवणूकदारांनी उत्साहात बाजारात सहभाग...