Friday, September 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाफेडकडून कांदा खरेदी दरात पुन्हा वाढ

नाफेडकडून कांदा खरेदी दरात पुन्हा वाढ

लासलगाव | वार्ताहर Lasalgaon

- Advertisement -

केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाफेड व एनसीसीएफ मार्फत करण्यात येणाऱ्या कांदा खरेदीच्या किमान हमी खरेदी दरात वाढ केली असून आज ३० जुलै पासून ग्रेड-ए दर्जाच्या कांद्यासाठी प्रतिक्विंटल २,३३५ रुपये इतका नवीन हमी दर लागू करण्यात आला आहे.

यंदाच्या कांदा खरेदी हंगामातील ही – सातवी दरवाढ असून, सुरुवातीला प्रतिक्विंटल १३५० रुपये दराने खरेदी सुरू करण्यात आली होती. तीन महिन्यात (९०) दिवसात १०८५ रुपयांची दरवाढ नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना मिळाली आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालया कडून याबाबत अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहे.

त्यानुसार, आज ३० जुलै पासून ग्रेड-यूआरएस कांद्याची खरेदी बंद करण्यात येणार असून, केवळ ग्रेड-ए दर्जाचा कांदाच खरेदी केला जाणार आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याला व्यापाऱ्यांकडून चांगले दर मिळत असल्याने शेतकरी कांदा विक्रीस प्राधान्य देत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी अधिकाधिक प्रमाणात नाफेडकडे कांदा विकावा आणि केंद्रीय खरेदी संस्थांकडे आवक वाढावी, यासाठीच नाफेडने पुन्हा एकदा खरेदी दर वाढविल्याचे बोलले जात आहे. दरवाढीमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असून, पुढील काळात बाजारातील परिस्थितीनुसार खरेदी धोरणात आणखी बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ११ सप्टेंबर २०२६ – विद्यार्थ्यांचा आक्रोश कोणी ऐकेल काय?

0
महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुणे शहरासह संपूर्ण राज्यामध्ये आज स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीमुळे एक अभूतपूर्व आणि चिंताजनक जनक्षोभ उसळला आहे. नीट परीक्षेपासून सुरू...