नाशिक | Nashik
नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी (Nashik and Dindori Loksabha) आज सोमवार (दि.०६) रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानुसार आज नाशिक लोकसभा मतदारसंघातून पाच तर दिंडोरीमधून पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे नाशिक लोकसभेसाठी ३१ तर दिंडोरीसाठी १० उमेदवार (Candidate) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामुळे आता दोन्ही लोकसभा मतदारसंघातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे.
हे देखील वाचा : Nashik Loksabha 2024 : शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढवणार; माघार नाहीच
नाशिक व दिंडोरी लोकसभेतील उमेदवारांच्या अर्जांची छाननी शनिवार (दि.४ रोजी) जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली होती. त्यावेळी छाननीमध्ये नाशिकमधील ३ तर दिंडोरीतील ५ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणातून बाद झाले होते. यानंतर छाननी झाल्यावर नाशिक लोकसभेच्या (Nashik Loksabha) निवडणूकीसाठी ३६ तर दिंडोरी लोकसभेच्या (Dindori Loksabha) निवडणूकीसाठी १५ उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले होते. त्यानंतर आज सोमवार (दि.०६) रोजी अर्ज माघारीच्या दिवशी नाशिक लोकसभेतून पाच तर दिंडोरीतून पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघातून ३१ तर दिंडोरीमधून १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
हे देखील वाचा : Dindori Loksabha 2024 : माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाणांची दिंडोरी लोकसभेतून माघार
दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी ३९ उमेदवारांनी ५६ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी शनिवारच्या छाननीत ६ उमेदवारांचे अर्ज रद्द ठरविण्यात आले होते. त्यानंतर उमेदवारांच्या अतिरिक्त अर्जांचे समायोजन केल्यानंतर निवडणूकीच्या रिंगणामध्ये ३६ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले होते. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी २० उमेदवारांनी २९ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी शनिवारच्या छाननीमध्ये ५ उमेदवारांचे अर्ज रद्द बातल करण्यात आले होते. त्यानंतर उमेदवारांच्या अतिरिक्त अर्जांचे समायोजन केल्यावर निवडणूक रिंगणामध्ये १५ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले होते. यानंतर आज उमेदवारी अर्ज माघारीनंतर दोन्ही मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
हे देखील वाचा : Loksabha Election 2024 : नाशिकमधील ३ तर दिंडोरीतून ५ उमेदवार निवडणूक रिंगणातून बाद