Monday, November 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजशेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला मुदतवाढ

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला मुदतवाढ

नवी दिल्ली | वृत्तसंस्था New Delhi

- Advertisement -

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने आज मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेला आणखी पाच वर्षांची मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली. या विस्तारासाठी केंद्र सरकारने ₹3 लाख 15 हजार 614 कोटींचा निधी मंजूर केला असून, ही योजना आता आर्थिक वर्ष 2030-31 पर्यंत सुरू राहणार आहे.मोदी सरकारच्या या निर्णयाची माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. या निर्णयासोबतच कॅबिनेटमध्ये प्रधानमंत्री ‘सूर्य सरोवर योजनेना'(PM-SSY)देखील मुदतवाढ देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे देशातील पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी मिळणारे ₹6,000 चे आर्थिक सहाय्य पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. ही रक्कम ₹2,000 च्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक बियाणे, खते, औषधे आणि इतर खर्च भागविण्यास मोठा हातभार लागणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू झालेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत 23 हप्त्यांद्वारे ₹4.47 लाख कोटींपेक्षा अधिक रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ देशभरातील 9.49 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळाला असून, महिला शेतकरीही मोठ्या प्रमाणात लाभार्थी आहेत.

केंद्र सरकारच्या मते, पीएम किसान योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीच्या हंगामी खर्चासाठी वेळेवर निधी उपलब्ध होतो. त्यामुळे खासगी सावकारांकडून कर्ज घेण्याची गरज कमी होते आणि कृषी उत्पादन वाढीस मदत मिळते. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर ठेवणे आणि कृषी क्षेत्रात गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.

तज्ज्ञांच्या मते, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नियमित आर्थिक आधार मिळत राहील. शेतीतील उत्पादन खर्च वाढत असताना मिळणारी ही थेट आर्थिक मदत लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी विशेषतः दिलासादायक ठरणार आहे. पीएम किसान योजनेची मुदतवाढ ही ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा आणि शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढविणारा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.

ताज्या बातम्या

Ashok Kharat Case : ३० साक्षीदार अन् ३ हजार पानांचे पुरावे;...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik दैवी शक्तींचे दावे, भविष्याची भीती आणि चमत्कारांच्या अमिषापोटी सामान्य भक्तांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या अशोककुमार एकनाथ उर्फ ‘कॅप्टन’ खरात (Ashok Kharat)...