Monday, November 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजविहिरीचे काम पूर्ण, मोजमाप सुरु असताना ढिगारा कोसळला; दगड, मातीखाली दबून चार...

विहिरीचे काम पूर्ण, मोजमाप सुरु असताना ढिगारा कोसळला; दगड, मातीखाली दबून चार मजुरांचा मृत्यू

मुंबई | Mumbai
विहिरीचे काम पूर्ण झाल्यानंतर मोजमाप करण्यासाठी खाली उतरलेल्या चार मजुरांवर अचानक माती आणि दगडांचा मोठा ढिगारा कोसळल्याची घटना घडली होती. या भीषण दुर्घटनेत चारही मजूर विहिरीत गाडले गेले. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ही घटना घडली. घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफच्या पथकाने बचावकार्य सुरू केले. तब्बल २४ तासांच्या प्रयत्नांनंतर ढिगाऱ्याखालून चारही मजुरांचे मृतदेह मिळाले. १६ नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंत चारही मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे आंबे आणि परिसरातील गावांवर शोककळा पसरली आहे.

शेतकरी निवास शिंदे यांच्या विहिरीचं काम पूर्ण झालं होतं. जवळपास 50 फूट खोलीच्या या विहिरीचं मोजमाप घेण्याचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. सदर दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच बेकायदा विहीर खोदणे आणि धोकादायक ब्लास्टिंग याचीही चौकशी होणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

- Advertisement -

नेमकी दुर्घटना कशी घडली?
पंढरपूर तालुक्यातील आंबे गावातील शेतकरी निवास शिंदे यांच्या शेतात विहिरीचे काम पूर्ण झाले होते. या विहिरीची खोली जवळपास ५० फूट असल्याची माहिती आहे. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास विहिरीचे मोजमाप करण्याचे काम सुरू होते. यासाठी चार मजूर विहिरीत उतरले होते. मोजमापाचे काम सुरू असतानाच अचानक विहिरीच्या एका बाजूचा माती आणि दगडांचा मोठा भराव कोसळला. काही क्षणांतच चारही मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

जय शाह यांच्यावर मोठी जबाबदारी! आयसीसीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध फेरनिवड

जेसीबीने प्रयत्न, मात्र मोठ्या दगडांमुळे अडथळे
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला जेसीबीच्या साहाय्याने ढिगारा हटवण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, ढिगाऱ्यात मोठमोठे दगड असल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण होत होते. मजूर खोल विहिरीत अडकल्याने आणि वरून पुन्हा माती-दगड कोसळण्याचा धोका असल्याने बचावकार्य अत्यंत काळजीपूर्वक करावे लागत होते. अखेर एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर शोधमोहीम अधिक वेगाने सुरू झाली.

एनडीआरएफच्या शोधमोहिमेत तीन मृतदेह बाहेर
एनडीआरएफच्या पथकाने रात्रभर बचावकार्य सुरू ठेवले. १६ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत दोन मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर सकाळी आणखी एका मजुराचा मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे समोर आले. या दुर्घटनेत सिद्धेश्वर घाडगे आणि मंगेश मोरे यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या मजुराचाही मृतदेह सापडला आहे.

दुर्घटनेची चौकशी होणार
या घटनेची संपूर्ण चौकशी पालकमंत्र्यांच्या आदेशाने एक समिती स्थापन करून होणार आहे. या शोधकार्यात विहिरीतून बाहेर काढलेल्या दगडांची तपासणी करून त्यावर असणाऱ्या केमिकलची ही तपासणी होणार असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिली. तसेच , सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतांमध्ये सुरू असलेल्या व परवानगी घेतलेल्या किंवा न घेतलेल्या विहिरींचे सर्वेक्षण करणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले. त्यामुळे विहीर दुर्घटनेनंतर सोलापूर जिल्हा प्रशासन मोठ्या प्रमाणावर अलर्ट मोडवर आहे.

ताज्या बातम्या

जय

जय शाह यांच्यावर मोठी जबाबदारी! आयसीसीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध फेरनिवड

0
नवी दिल्ली | New Delhiआंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महत्त्वाच्या घडामोडीत जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध फेरनिवड झाली आहे. बाली येथे...