Friday, May 3, 2024
Homeनाशिकएक, दोन नाही तब्बल सव्वातिनशे वेळा 'ते' चढले कळसुबाई शिखर

एक, दोन नाही तब्बल सव्वातिनशे वेळा ‘ते’ चढले कळसुबाई शिखर

जाकीर शेख | प्रतिनिधी Zakir Shaikh Ghoti

इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri taluka) कळसुबाई मित्रमंडळाच्या (Kalsubai mitra mandal) सदस्यांनी गेल्या २५ वर्षांपासून नवरात्र उत्सवात कळसुबाई च्या शिखरावर अखंडितपणे जाण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे २५ वर्षात नवरात्र उत्सवाबरोबरच इतर प्रासंगिक कारणांमुळे ही शिखरावर जात आज पर्यंत 2५ वर्षात ३२५ वेळा कळसुबाईच्या शिखरावर जाण्याचा विक्रम कळसुबाई मित्र मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाआखाली या जवळपास १५० युवकांनी विक्रम केला….

- Advertisement -

महाराष्ट्रातला नव्हेतर देशातील हा पहिलाच विक्रम ठरावा असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, शरीराची साथ व देवीचा आशीर्वाद राहिला तर व सकारात्मक साथ हा त्रिवेणी संगम कायम राहिला तर हा विक्रम पुढे ही कायम राहील.जणू काही कळसुबाई व घोटीचे ट्रेकिंगविर हे एक सुत्रच झाले आहे.

गड किल्यांच्या संवर्धनाचा वसा घेवून गेली २५ वर्ष या कार्यात झोकून देणाऱ्या युवकांच्या आगळयावेगळ्या छंदाची ख्याती राज्यभर पसरली आहे.पर्यावरण,आरोग्य,स्वच्छता, वृक्षारोपनासह एकात्मतेचे संदेश देणारे हे युवक तालुकाभर कौतुकास्पद कामगिरी करीत आहेत. (Environment awareness)

राज्यातील अनेक किल्ले खडतरपणे चढ़ाई करीत आपल्या जगावेगळ्या इच्छेसाठी झटनारे युवक अनेकांना प्रेरणादायी ठरले आहेत १९९७ मध्ये घोटी (ता.इगतपुरी)येथील गड किल्यांची स्वत चढ़ाई करुन सफरीचा आनंद घेणारे ध्येयवेडे युवक भागीरथ मराडे आणि अन्य दोघे युवक सतत सर्वात उंच असणाऱ्या कळसुबाई शिखरावर जायचे.यावेळी ते चढ़ाई करतांना डोंगरावर असणारी अस्वच्छता दूर करीत उपयुक्त झाडांची लागवड करायचे.

यासह त्या त्या ठिकाणी काहींनी केलेले विद्रूपीकरण दूर करीत शक्य तेवढे निर्मळ करायचे.यातच भागीरथ मराडे यांचा आदर्श घेत जवळपास १५० ते २०० युवक या कार्यात सहभाग घ्यायला लागले.त्याच वर्षी या ध्येयवेड्या युवकांनी कळसुबाई मित्र मंडळाची स्थापना केली. स्वखर्चाने करीत असलेल्या या उपक्रमातुन ते वृक्षारोपण करुन त्याचे जतन करतात.गड किल्ले आणि डोंगरावर वाढलेले घाणीचे साम्राज्य,पाण्याच्या रिकाम्या बाटल्या,प्लास्टिकचा कचरा स्वयंप्रेरनेने दूर करीत स्वच्छतेचा संदेश देतात.दगडांवर विविध लोकोपयोगी संदेश लिहिले जातात.

गेली २५ वर्षापासून दरवर्षी नवरात्री मध्ये हे युवक रोजच कळसुबाई शिखरावर पाणी पाऊस वादळ वारा याचा कुठलाही विचार न करता चढ़ाई करतात. कुठल्याही गड किल्ल्यावर चढण्याची सुरवात करण्याअगोदर विधिपूर्वक पूजन करण्यात येते. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सर्वात उंच असणाऱ्या कळसुबाई शिखरावर एकदा कोणी गेला तर किमान आठ दिवस आजारी पडल्याशिवाय रहात नाही.

अन हे युवक नवरात्रीत सलग नऊ दिवस चढ़ाई करून आपला उपक्रम मोठ्या उत्साहात पार पाडतात. यांचा हा उपक्रम सर्वदुर ख्याती पावला असल्याने तालुक्यातील अनेक युवक युवती यात मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.

इगतपुरी या आदिवासी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या घोटी (Ghoti) शहरातील जिद्दी युवकांनी गेली २५ वर्षापासून नवरात्रोत्सव (Navratrotsav 2021) काळात सुरु केलेली पर्यावरणरक्षणाची परंपरा या युवकांनी आजही जपली असून, हे युवक नित्यनियमाने यावर्षीही राज्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसूबाई शिखरावर पायी जावून मंदिर परिसराची व शिखरपरिसराची स्वच्छता करून पर्यावरणाचा होणारा -हास रोखण्यासाठी धडपड करीत असल्याचे दिसत आहेत.

या युवकाच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.कळसूबाई शिखरावर असणाऱ्या कळसूबाई मातेच्या दर्शनाच्या ओढी बरोबर या युवकांना मंदिर परिसराचे पावित्र्य आणि पर्यावरणाचा -हास रोखण्यासाठी शिखर परिसराची स्वच्छता करण्याचे जणू वेडच लागले आहे.

या ध्येयवेडे युवक आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी नवरात्रीतील नऊ दिवस पूर्णपणे उपवास धरून,रामप्रहारीच १६४६ मीटर उंचीच्या अंतराचे हे शिखर मोठ्या उत्साहाने पादाक्रांत करतात.सूर्योदय होण्यापूर्वी मंदिराजवळ पोहचून सूर्याची पहिले किरण मंदिरावर पडताच कळसूबाई मातेची आरती घेऊन मातेच्या चरणी नतमत्सक होत पुन्हा त्याच उत्साहाणे खाली उतरतात.हा क्रम नऊ ही दिवस तितक्याच उत्साहाने होतो.

इगतपुरी तालुक्याला भौगोलिक परिस्थिती डोंगरद-याची लाभलेली,चहूबाजूला डोंगरदऱ्या असल्याने घोटीतील भगीरथ मराडे यांच्यासह त्यांचे सहकारी 1997 पासून कळसुबाई शिखरावर नवरात्री मध्ये घटस्थापना करून रोज नऊ दिवस जाऊन मातेची पुजा करणे तसेच मंदिराची व परिसरातील स्वच्छता करणे हा नित्यनियमाने गेली २५ वर्षा पासून करीत आहे. या अगोदर हा उपक्रम कोणीही केलेला नाही.

नवरात्र उत्सवात रोज पाहाटे सुर्यदयापूर्वी शिखरावर घटस्थापना करून पहिल्या माळेला सूरवात केली. दरम्यान भगीरथ मराडे यांनी जुनी दुचाकी घेत या दुचाकीवरून रपेट मारण्याचा शोक होता. यापोटी त्यांनी आपण नवरात्रात नऊ दिवस कळसूबाई दर्शनाला जाण्याची कल्पना आपल्या सहकाऱ्यापुढे मांडली.या कल्पनेस त्यांच्या मित्रांनीही सकारात्मक प्रतिसाद देत नवरात्रीतील नऊ दिवस कळसूबाईच्या दर्शनाला जाण्याची तयारी दाखविली.आणि सन १९९७ साली या उपक्रमाला सुरुवात झाली.

पहिल्याच वर्षी कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी निघालेल्या या युवकांना बारी घाटातच एका पट्टेदार वाघाने दर्शन दिले.पण या बाबीला या युवकांनी न घाबरता आपली दिनचर्या कायम चालूच ठेवली.आज २५ वर्षानंतरही तितक्याच उत्साहाने आणि उमेदीने हे युवक कळसूबाई शिखरावर नित्यनियमाने जातात आणि मातेच्या दर्शनाबरोबर मंदिर परिसरात भाविकांनी टाकलेला पर्यावरणाच्या हानिकारक कचऱ्या ची विल्हेवाट लावतात.

गेल्या 2५ वर्षापासून तिघांनी सुरु केलेल्या उपक्रमात आज युवकाची दहापट झाली आहे.यामुळे या युवकांनी कळसूबाई मित्र मंडळाची स्थापनाही केली आहे.सदरच्या उपक्रमात युवकाची संख्या वाढत जावून शतकोत्तर झाली आहे.यामध्ये वीस ते पंचवीस वयोगटातील युवकाची संख्या अधिक आहे.हे विशेष.सर्व युवक नवरात्रोत्सवात पहिल्या दिवसापासून एकत्रित घोटीतून मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास दुचाकी व अन्य वाहनाने निघतात.आणि कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी पाच वाजेपर्यंत पोहचतात.

अन लगेच समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर उंचीवरील शिखर सर करण्यास सुरुवात करतात.दीड तासात सर्व युवक शिखरावर पोहचून मंदिर परिसराची स्वच्छता करतात.देवीची पूजाअर्चा करतात.आणि सूर्याची पहिले किरण देवीच्या मुखावर पडताच मनोभावे आरती करतात.व पुन्हा त्याच उत्साहाने माघारी फिरतात.हा नित्याचा उपक्रम.

राज्यातील सर्वाधिक उंचीचे आणि थंड हवेचे ठिकाण असल्याने अनेक पर्यटक,गिर्यारोहक कळसूबाई शिखरावर येत असतात.विशेषतः मुंबई पुण्याचे पर्यटक अधिक येतात.परंतु येणारे पर्यटक हे पर्यावरणाला मारक ठरतील अशा प्लास्टिकच्या चीजवस्तू इथेच सोडून जातात.अर्थातच यामुळे पर्यावरणाची हानी होते.याची जाणीव ठेवून सदरचे युवक पर्यटकांमध्ये जागृती व्हावी.यासाठी प्रयत्न करीत आहेत.

कळसूबाई शिखर (kalsubai fort) परिसरात पडलेला कचरा गोळा करून विल्हेवाट लावतात.याशिवाय आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थामध्येही पर्यावरण जपण्यासाठी जाणीव जागृती हे युवक करीत आहेत.तसेच काही वर्षापासून हे युवक नववर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारीला आणि गुढी पाडव्याच्या दिवशी हे युवक पर्यावरण रक्षणाच्या या उपक्रमासाठी या शिखरावर जातात.

कोणतीही यात्रा,उत्सव धार्मिक कार्यक्रम सार्वजनिक कार्यकम हे संपन्न झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येतो.हा कचरा पर्यावरणास हानिकारक असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होतो.राज्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसूबाई मातेच्या भक्तीच्या ओढीमुळे शिखर सर करण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या या उपक्रमातच मंदिर परिसर व शिखराचे पावित्र्य राखण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या स्वच्छता मोहिमेस या वर्षीही युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून,यापुढेही हा उपक्रम कायम चालू राहील

भगीरथ मराडे

इगतपुरी तालुक्यातील घोटी शहरातील उपक्रम हा सर्वसमान्यांसाठी कौतुकाचा विषय झाला आजचा तरुण व्यसनाधीन झाला आहे मात्र घोटी शहरातील १५० ते २०० युवक राज्यातील सर्वात उंच असलेले कळसूबाईचे शिखरावर पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यत्न हे युवक कळसूबाईचे शिखर सर करतात व आलेल्या भाविकाना मदत करतात तर आतापर्यंत त्यांच्या कार्याची स्वता बाबासाहेब पुरंदरे ,राजसाहेब ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दखल घेत त्यांच्या वतीने मातेच्या चरणी घटिकाचे पूजन करून अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या कडे सुपूर्द केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या