Tuesday, July 28, 2026
Homeनगरघारगावमध्ये पोलिसांचा छापा; ७० लिटर ताडी दारूसह महिला जेरबंद

घारगावमध्ये पोलिसांचा छापा; ७० लिटर ताडी दारूसह महिला जेरबंद

घारगाव । प्रतिनिधी

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील एका ‘फिटनेस जिम’च्या पाठीमागे बेकायदेशीररित्या ताडी दारू विकणाऱ्या एका महिलेवर घारगाव पोलिसांनी गुरुवारी दुपारी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ७ हजार रुपये किमतीची ७० लिटर ताडी दारू जप्त केली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. यात सुनिता शेखर गुत्तेदार (वय ४५, रा. घारगाव) ही महिला रंगेहात दारू विक्री करताना पकडली गेली. तिच्या ताब्यातून प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरलेली ताडी जप्त करण्यात आली.

पोलिसांनी रासायनिक तपासणीसाठी नमुना ठेवून उर्वरित मुद्देमाल जागेवरच नष्ट केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार राजेंद्र कोरडे करत आहेत.

ताज्या बातम्या

विद्यार्थी आंदोलनातील गुन्हे मागे घेणार – मुख्यमंत्री फडणवीस यांचे गृह विभागाला...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai नीट पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांविरोधात राज्यात ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने...