Monday, May 20, 2024
Homeजळगावचाळीसगाव एज्युकेशनच्या निवडणुकीसाठी ३६ उमेदवार रिंगणात

चाळीसगाव एज्युकेशनच्या निवडणुकीसाठी ३६ उमेदवार रिंगणात

चाळीसगाव Chalsigaon प्रतिनिधी

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या (Chalisgaon Education Society) होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या ९६ उमेदवारांपैकी तब्बल ६० उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता एकूण १६ जागांसाठी ३४ उमेदवार निवडणुकीच्या (election) रिंगणात आहेत. माघार घेतलेल्यापैकी अनेकांनी सेटेलमेन्ट केल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात आहे. चाळीसगाव निवडणुक सत्ताधारी नारायण भाऊ अग्रवाल यांच्या प्रगती व डॉक्टर विनोद कोतकर आणि डॉक्टर सुनील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय काकासाहेब वाघ पूर्णपात्रे प्रेरित परिवर्तन पॅनल मध्ये ही लढत होणार आहे.

- Advertisement -

गटनिहाय उमेदवार

अध्यक्षपदासाठी केबी साळुंखे, रामकृष्ण चुडामन पाटील, चंद्रकांत चिंतामण वाणी अपक्ष, उपाध्यक्ष पदात सौ सुचित्रा राजेंद्र पाटील, मिलिंद बबनराव देशमुख, सचिव गटात डॉ. विनोद मुरलीधर कोतकर, मिलिंद वामन बिल्लीकर, अरुण शंकर पाटील, सीनियर पॅटर्न सुरेश रामचंद्र स्वार, प्रशांत मुरलीधर पाटील, बाळासाहेब विश्वासराव चव्हाण, सुरेश हरदास चौधरी, पेट्रन गटातसाठी भोजराज प्यारेलाल पुंसी, निलेश नंदलाल छोरीया, राजेंद्र रामदास चौधरी, फिरोज गटासाठी नारायण मांगीलाल अग्रवाल, योगेश हिरामण काळ, अग्रवाल जुगल किशोर शालिग्राम परिवर्तन असे तीन उमेदवार आहेत. सर्वसाधारण गटातील दोन जागांसाठी मुरलीधर रामकृष्ण अमृतकार कनकसिंग भानसिंग राजपूत, महारु सोनू बाविस्कर, डोनर गटात भूषण अशोक ब्राह्मणकार, वर्धमान सुभाषचंद्र धाडीवाल, डॉ.सुनील अमरसिंग राजपूत, सुधीर पुंडलिक पाटील, विजय मदनलाल शर्मा, महेंद्र सिताराम पाटील, दिलीप रामराव चौधरी, अशोक बाबुलाल वाणी, जितेंद्र आनंदा वाणी, राकेश भास्करराव साळुंखे, श्यामलाल वामन कुमावत, भानुदास दत्तात्रेय जाधव आदि उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून मतासाठी त्यांनी प्रचारास जोरादार सुरुवात केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या