Saturday, September 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! मराठा आरक्षण मोर्चासाठी निघालेल्या मराठा आंदोलकाचा हृदयविकाराने मृत्यू

मोठी बातमी! मराठा आरक्षण मोर्चासाठी निघालेल्या मराठा आंदोलकाचा हृदयविकाराने मृत्यू

जुन्नर | Junnar
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी काल (27 ऑगस्ट) अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. आज सकाळी मनोज जरांगे पाटील शिवनेरीवर पोहचले. यानंतर मनोज जरांगे पाटील आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. राज्यभराच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून मराठा बांधव हे थेट आता मुंबई गाठत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, मराठा मोर्चातील एका मराठा आंदोलकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. सतीश देशमुख असं मृत व्यक्तीचं नाव असून मुंबईतील मनोज जरांगेंच्या उपोषणापूर्वीच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या एका आंदोलकाचा जुन्नरमध्ये मृत्यू झाला आहे. आंदोलकाच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर मनोज जरांगे यांच्यासह संपूर्ण मराठा आंदोलकांमध्ये दु:खाची लाट पसरली. याबाबत जरांगेंनी देखील संवेदना व्यक्त केल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने जाताना ही दुर्दैवी घटना घडल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सतीश देशमुख असे मृत पावलेल्या मराठा आंदोलकाचे नाव आहे. ते बीडच्या केज तालुक्यातील वरडगाव येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. मराठा आंदोलक जुन्नरमध्ये आले असता, सतीश देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आला. या घटनेनंतर त्यांना तातडीने जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

सतीश देशमुखांच्या मृत्यूनंतर मनोज जरांगे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मला आता माहिती कळाली की आमचा देशमुख नावाचा बांधव प्रवासात असताना त्यांचा दम छाटला आणि त्यांना अटॅक आला. मी याबाबत अजूनही माहिती घेत आहे. परंतु ही घटना अत्यंत दुःखद आहे. याला जबाबदार फडणवीस साहेब आहेत. तुम्ही आता जर का आम्हाला आरक्षण दिले तर आमचे बळी जाणार नाहीत. आमचे आणखी दोन बळी घेतले आहेत. लातूरला परवाच्या दिवशी अशीच घटना घडली आहे. आज देखील अशीच घटना घडली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

मुंबईच्या आझाद मैदानात हळूहळू आंदोलक येण्यास सुरुवात झाली आहे. मोठ्या संख्येने मराठा बांधव आझाद मैदानामध्ये येताना दिसत आहे. मोर्चामधील गर्दी आतापर्यंतचे सर्व उच्चांक मोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आझाद मैदानात जमलेल्या आंदोलकाकडून घोषणाबाजी करण्यात आली. मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव राज्याच्या कानाकोपऱ्यातून आझाद मैदानात दाखल होत आहे. विशेष म्हणजे या मोर्चात ओबीसी आणि मुस्लिम बांधवांचा देखील समावेश आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

खुशी हाच माझा स्वभाव; देण्यातच आनंदाचा खरा पासवर्ड – राजयोगी ब्रह्माकुमार...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik खुशी हाच माझा स्वभाव आणि धर्म आहे. जीवनातील प्रत्येक कर्म आनंदाने केले पाहिजे. केवळ मिळवण्याच्या मागे धावण्यापेक्षा इतरांना देण्याची वृत्ती आत्मसात...