Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजशेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई प्रतिनिधी
संकटाच्या प्रत्येक काळात महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे. आताही दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनाच आमचे संपूर्ण प्राधान्य राहील. महायुतीचे सरकार शेतकरी बांधवांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिली.

राज्य सरकारने आज राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना शिंदे यांनी हा निर्णय केवळ कागदावरचा नाही तर दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या अडचणी कमी करण्यासाठी शासनाने तातडीच्या उपाययोजनांचे पॅकेजच प्रत्यक्षात आणल्याचे सांगितले.

- Advertisement -

राज्यात दुष्काळ जाहीर, महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या…

घोषणा नाही, अंमलबजावणीवर भर
दुष्काळ जाहीर करणे ही सुरुवात आहे. शेतकऱ्याला प्रत्यक्ष मदत मिळणे हे आमचे अंतिम उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत चिंता करू नये. शेतकरी बांधवांनी टोकाचा निर्णय घेऊन नये, असे आवाहन करतानाच शिंदे यांनी संकटाच्या काळात शासन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे स्पष्ट केले. दुष्काळी परिस्थितीचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. जिथे अतिरिक्त उपाययोजनांची आवश्यकता असेल, तिथे त्या देखील तातडीने करण्यात येतील,असेही त्यांनी सांगितले.

महायुती सरकारच्या काळात शेतकरी हा केवळ योजनांचा लाभार्थी नसून शासनाच्या निर्णयप्रक्रियेच्या केंद्रस्थानी आहे. नैसर्गिक संकट कितीही मोठे असले तरी शेतकऱ्याला एकटं सोडलं जाणार नाही, असेही शिंदे म्हणाले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गांजा कारवाईतील तक्रारीनंतर चार अंमलदारांच्या बदल्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar कोतवाली पोलिसांनी केलेल्या कथित गांजा कारवाईतील कागदपत्रे, स्टेशन डायरीतील नोंदी आणि सीसीटीव्ही फुटेजमधील घटनाक्रमात विसंगती असल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक...