Friday, May 3, 2024
Homeधुळेकंटेनरमधून 47 लाखांची व्हॅक्सिन लंपास

कंटेनरमधून 47 लाखांची व्हॅक्सिन लंपास

धुळे । Dhule

कंटेनरमधून चोरट्यांनी तब्बल 47 लाखांचे व्हॅक्सीन लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. टान्सपोर्ट व्यावसायिक कौस्तुभ किशोर कुलकर्णी (वय 46 रा.सुदर्शन सोसायटी, कल्याण) यांनी याबाबत पोलिसात दिलेल्या फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

त्यानुसार, दि.8 रोजी दुपारी 3.45 ते दि. 9 सप्टेंबर रोजी पहाटे 2.50 वाजे दरम्यान भिवंडी (जि.ठाणे) ते पिंपरखेडा शिवारातील हॉटेल अन्नपुर्णा दरम्यान ही चोरी झाली. कंटेनरच्या (क्र.एम.एच.04/एच.डी.4639) मागील दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी मुद्येमाल चोरून नेला. त्यात 12 लाख 59 हजार 964.72 रूपये किंमतीच्या एमएसडी कंपनीचे 2 हजार 100 व्हॅक्सीन, 10 लाख 59 हजार 19 रूपये किंमतीचे 1500 व्हॅक्सीन, 2 लाख 23 हजार 493 रूपये किंमीतचे 600 व्हॅक्सीन, 1 लाख 20 हजार 808 रूपये किंमतीचे एमएसडी कंपनीचे व्हॅक्सीनचे दोन उघडलेले बॉक्स आणि 69 हजार 428 रूपये किंमतीचे इमरसन 50 व्हॅक्सीन असा एकुण 47 लाख 32 हजार 715 रूपये किंमतीचा मुद्देमालाचा समावेश आहे. नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रामनाथ दिवे हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या