Friday, July 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजएनटीएचे ४७ अधिकारी तडकाफडकी बडतर्फ

एनटीएचे ४७ अधिकारी तडकाफडकी बडतर्फ

नवी दिल्ली | वृत्तसंस्था New Delhi

- Advertisement -

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात चांगलंच वातावरण तापलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे.

राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्र सरकारने राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी (NTA) मध्ये मोठे प्रशासकीय बदल करण्यास सुरुवात केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या निर्देशानुसार एनटीएच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी व्यापक फेरबदल करण्यात येत असून, त्याचाच भाग म्हणून तब्बल ४७ अधिकाऱ्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणामुळे एनटीएच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर केंद्र सरकारने एनटीएची संपूर्ण रचना आणि परीक्षा व्यवस्थापन प्रणालीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून, परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी नवीन यंत्रणा उभारण्याची तयारी सुरू आहे.

शिक्षण मंत्रालयाकडून एनटीएमध्ये तांत्रिक सुधारणा, मनुष्यबळ पुनर्रचना आणि परीक्षा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. आगामी काळात परीक्षा प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ नये, यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

दरम्यान, या कारवाईमुळे एनटीएमधील प्रशासकीय बदलांना वेग आला असून, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी केंद्र सरकार आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ताज्या बातम्या

दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या वतीने आज टॉर्च मार्च काढण्यात आला.सायंकाळी 6 वाजता कॅनडा कॉर्नर येथून...